-
Aispais Gappa Neelamtainshi (ऐसपैस गप्पा नीलमताईंश
राजकारण आणि समाजकारण या दोन तलवारी एकाच म्यानात राहत नाहीत, हे वचन खोटं ठरवणार्यार कार्यकर्त्या. स्थानिक प्रश्नांवर काम करताना वैश्विक घडामोडींचे भान ठेवून उत्तरे शोधणार्याा नेत्या. आपत्ती व्यवस्थापनात स्त्रियांच्या गरजांचा आणि अडचणींचा स्वतंत्र विचार करणार्याा कुशल व्यवस्थापक. तिसर्यार जगातील स्त्रियांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावर पोचवण्यासाठी धडपडणार्या् अभ्यासक. उत्तम वक्त्या आणि अभ्यासू लेखिका. नीलमताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू या गप्पांमधून समोर येतात आणि उलगडत जाते एका सामाजिक कार्यकर्तीचे मानस व चिंतनशील राजकारणीचे अंतरंग.
-
Tumhi Bi Ghada Na (तुम्ही भी घडा ना)
‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’’. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात, माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाहीला बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन …
-
Pramanikahi Sundarahi (प्रामाणिकही सुंदरही)
अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’ ‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक
-
Palbharahi Nahi Hay Hay (पळभरही नाही हाय हाय)
दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धात उतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून ते मलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला. असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांना स्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखल घेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावर आणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो. हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
-
Baimanoos
घरात बाईमाणूस असले म्हणजे घराला घरपण येते, असे म्हणतात. पण स्त्रीची अवहेलना गेल्या अनेक शतकांपासून होत आहे. स्त्रीला पुरुषापेक्षा दुय्यम, कमकुवत व दुर्बल समजल्याने तिच्या विकासाची पहाट स्त्रीमुक्ती चळवळीनंतर उगवली. स्त्री ही मानव आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला हक्क, अधिकार आहेत, तिला स्वतंत्र स्थान आहे, हे सांगण्यास सुरुवात झाली. या चळवळीचे वर्णन 'बाईमाणूस' मधून करुणा गोखले यांनी केले आहे.