Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.