-
Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.
-
Lokakatha 78 Aani Tyavishayee Sarvakahi (लोककथा ७८
‘लोककथा’७८’ हे चाळीस वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले नाटक त्यातील भेदक सामाजिक आशय आणि रंगमंचीय सादरीकरणातील वेगळेपणा यांमुळे बरेच चर्चेत आले. गेल्या चाळीस वर्षांत स्वतः लेखक रत्नाकर मतकरी, मराठीतले अनेक मोठे समीक्षक, पत्रकार, या नाटकात काम केलेले कलाकार अशा अनेकांनी या नाटकाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नाटकातून व्यक्त होणाऱ्या आशयामुळे आजही महत्त्वाच्या असलेल्या या नाटकावरील प्रतिक्रिया या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत. त्याबरोबरच मूळ नाटकाची रत्नाकर मतकरींनी नव्याने वाढवलेली संहिताही यात समाविष्ट केली आहे.
-
Krushnakanya (कृष्णकन्या)
गेली साठहून अधिक वर्षं रत्नाकर मतकरींचं कथालेखन अविरत चालू होतं. परीकथांपासून सुरू झालेली मतकरींची कथा, सर्वाधिक रमली, ती ‘गूढकथा’ या कथाप्रकारात. अडीचशेहून जास्त कथांद्वारे मतकरींनी गूढकथांना अफाट लोकप्रियतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आणि तरीही, त्यांचं सामाजिक कथालेखनही लक्षणीय राहिलं. या वास्तववादी सामाजिक कथांमधून मतकरी समाजातल्या विसंगतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध सातत्यानं आवाज उठवत राहिले. शैली कोणतीही असो, मतकरींनी कायम शोधला, तो माणसातला ‘माणूस.’ म्हणूनच नियतीची चेष्टितं, काळ, मृत्यू अशा अनादि-अनंत संकल्पनांची चित्तवेधक रचना करीत वाचकाला गुंगवून टाकणाऱ्या मतकरींच्या वैविध्यपूर्ण कथा चिरस्मरणीय ठरल्या. ‘कृष्णकन्या’ ही मतकरींचा परीसस्पर्श असलेल्या अशाच अनोख्या कथांची अमूल्य भेट. मतकरींच्या शेवटच्या अप्रकाशित कथांपैकी निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपात आणणारा संग्रह म्हणूनही ‘कृष्णकन्या’चं महत्त्व अनन्यसाधारण असंच.
-
Darkness .
A boy who can predict the exact date a person will die... An elderly woman who knows that death is close, but learns how to cheat it... A child with a dangerous friend who happens to be invisible... A ghost who can t stop reliving his suicide over and over again... People you ll wish you never have to meet, and stories you ll never forget. Skilfully translated into English for the very first time, these chilling tales from master storyteller Ratnakar Matkari are bound to keep readers of all ages up at night. With every page you turn, you ll be looking over your shoulder to make sure no one s there. Look again. Maybe there is!
-
Nirmanushya (निर्मनुष्य)
मतकरींच्या प्रगल्भ शैलीतून साकार होत असलेल्या अगदी अलिकडच्या गूढकथांचा हा संग्रह. वास्तवाच्या पायावर उभे असलेले कल्पनेचे जग, मानसशास्त्रावर आधारलेले भीतीचे विश्व मतकरींच्या कथांमधून साकार झाले आहे. उत्कंठा वाढवणारा संदेश आणि गारठून टाकणारे भय यांच्या जोडीनेच, प्राणीमात्राविषयी करूणा आणि अंतिम न्यायाचा आग्रह, राजकारणाचा स्पर्श हे त्या कथांचे लेखनसूत्र आहे. या आशयसंपन्नतेमुळे मतकरींच्या कथा बदलत्या काळागणीक अधिकाधिक अर्थगर्भ होत गेल्या आहेत. गूढकथा ही वाचकाला अचंब्यात टाकण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी लिहिलेली कथा नसून, ती मानवी जीवनावर भाष्य करण्यासाठी निवडलेली एक वेगळी दृष्टी आहे हेच या कथा वाचताना जाणवते.
-
Nijdham (निजधाम)
बोलावणं... निजधाम... जेवणावळ... रत्नाकर मतकरींच्या या असाधारण गूढकथांनी मराठी कथेमध्ये एक नवीन वाट तयार केली. या कथांमधील वातावरणे, चित्रदर्शी वर्णने, माणसाच्या मनातल्या गूढाचा घेतलेला वेध, वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि हादरवून टाकणारा शेवट, या साऱ्यांनी मराठी कथेत त्या वेळेपर्यंत अस्तित्वात नसलेले एक विलक्षण कथाविश्व निर्माण केले. यातल्या कथा रंगभूमीवर आल्या, दूरदर्शनवर सादर झाल्या, अनुवादित झाल्या. मुख्य म्हणजे, दोन पिढ्यांच्या मनावर गारूड करून राहिल्या. फार वर्षांपूर्वी वाचलेल्या या कथा वाचकांच्या स्मरणातून कधीच गेल्या नाहीत. उलट त्यांनी त्या इतरांना सतत सांगून जिवंत ठेवल्या. आजच्या तरुणांना तर या गूढकथांचे अधिकाधिक आकर्षण वाटू लागले आहे... या, कालच्या आणि आजच्या व उद्याच्या वाचकांसाठी नव्या स्वरूपात काढलेला गूढकथांचा संग्रह... Keywords
-
Pardeshi (परदेशी)
नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, ‘परदेशी’ या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!
-
Madhyaratriche Padgham (मध्यरात्रीचे पडघम)
"तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो... गुळगुळीत टक्कल. अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा ! पोपटाच्या चोचीसारखं नाक ! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे ! मला तर त्यांच्या डोळ्यांची भीतीच वाटते... ...त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर 'धम धम' वाजवत होतं. त्याच 'धम धम धम' तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक 'गूंऽऽ' असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा 'धम धम' वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय ? बिछान्यात आहेच कोण ? बिछाना रिकामा... डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच ! काळोख... आणि 'धम धम' वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली..." ओळखीच्या - बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणार्या, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणार्या कथांचा हा संग्रह.
-
Trupt Maifal (तृप्त मैफल)
वेळोवेळी, काही ना काही निमित्ताने मी केलेले विविध व्यक्तीविषयीचा लिखाण या संग्राहात एकत्रित केलेले आहे. त्याचाविषयीचा पहिला आणि कायम झालेले संस्कार या लेखामध्ये आहे. 'संस्कार' हा शब्द वापरण्याला आणखी एक कारण आहे . यातल्या व्यक्ती नामवंत आहेत , त्याचे एकूण संस्कृतीलाच झालेले योगदान उघड आहे . परंतु ज्या व्यक्ती त्याचा इतका ख्यातनाम नाहीत, त्याचाही स्वभावाची अलोकिक बाजू मला दिसलेली आहे. त्या सर्वाचा व्यक्तीमत्तावाचे मुल्यमापन करण्याचा अधिकार मला नाही, पण त्याच्यात जे चांगले दिसले, त्यामुळे माझे आयुष्य उजळून निघाले. त्यांनी माझ्यावर कळत-नकळत जे सुसंस्कार केले, त्याप्रीत्यथ कॄतज्ञतेपोटी मी यातले काही लेख लिहिलेले आहेत … लहानशा अवकाशात, माझी त्या त्या व्यक्ती विषयीची भावना व्यक्त करण्याचा कसोशीचा प्रयत्न मी केला आहे . या सर्व व्यक्तीने माझे जीवन अधिक सुंदर, अधिक संपन्न केले, माझे व्यक्तीमत्तव घडवले - त्यांना हि आदरांजली .
-
Investment (इन्व्हेस्टमेंट)
रत्नाकर मतकरी यांच्या, वास्तववादी शैलीतल्या ८ कथांच्या या संग्रहामद्ये, आजच्या समाजजीवनातील अधोगतीचे चित्रण, भरगच्च तपशिलासह केलेले आहे. या कथांमधून, आजच्या अनेक भीषण सामाजिक समस्यांवर मतकरी भाष्य करत[...]