-
Mansachya Goshti (माणसाच्या गोष्टी)
माणूस हां, निरिक्षकाला खुपच गोंधळात टाकणारा प्राणी आहे. तो विसंगत वागातोच, पण कधी कधी अनपेक्षितपणे सुसंगिताही वागतो. कधी खूप प्रेमाने वागतो, टार कधी अकारण आकास ठेवतो. गर्दी जमा करथो, पण गर्दीतही एकटाच असतो. जगण्याची उमेद ठरतो, पण आयुष्यभर कसली ना कसली खान्ताही बाळगतो. माणूस आणि जगाने, माणूस आणि मरण, माणूस आणि स्पर्श, माणूस आणि प्रेम, आशा माणसाशी संबधित नानाविध गोष्टींच्या या कथा आहेत. या माणसाच्या गोष्टी आहेत.
-
Shabd...Shabd...Shabd! (शब्द.. शब्द.. शब्द!)
"....हे सांर आज अचानक आठवलं, वर्त्तमानपत्र वाचताना. वाटलं, आपण सगळे एका प्रचंड नाटकाचे प्रेक्षक आहोत. ...पण आपण अमेरिकाताले प्रेक्षक नाही. आपण शंका विचारित नाही. राजकारणी भ्रष्टाचार करणारच, कस्टम्स लाच घेणारच, पुलिस गुंड सज्जनांचा छळ करणारच, निवडनुकांना पैसा हवा, पैशासाठी सगली पापं हवीत, हे सागळ आपण मान्य करतो. लोकशाहीत लोकांना काही करायला हवं, असं आपण मानत नाही, तात्विक चर्चेपेक्षा अधिक काही करणं हां आततायीपाणा होइल, असं त्यांना वाटतं. एकटीदुकटी मेधा पाटकर राजकारण्यांना प्रश्न विचारायला उभी राहिली, टार तोही त्याना माथेफ़िरुपनाच वाटतो. रंगमंचावाराचा खेळ असाच विनाशाच्या दिशेनं चालु राहतो. तटस्थ्य सोशील भारतीय प्रेक्षक तो मुकाट्यानं पाहत राहतो.'
-
Kabandha (कबंध)
गूढकथा म्हणजे काय ? तर आयुष्याच्या एखाद्या मुलुखावेगळ्या गूढपैलूविषयी लिहिलेली कथा. मृत्यू ही गोष्ट अशीच गूढ आहे. मृत्यू होताना नेमके काय होते याचे रहस्य अजून उमगलेले नाही. विज्ञानाने मानवी शरीर नष्ट होण्याचे स्वरूप उलगडले. परंतु मानवी मन, त्याच्या भावना, वासना हे शरीराबरोबरच नष्ट होते का ? याचे अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या सर्व गूढतेचे सर्वसामान्यांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. परंतु विज्ञानाच्या दृष्टीने या विषयात कितीसे तथ्य असते हा विवाद्य विषय आहे. त्यामुळे वास्तववादी कथा म्हणजे कलात्मक कथा आणि गूढकथा या कलाशून्य असे ढोबळ समीकरण बेतले गेले आहे. रत्नाकर मतकरींच्या गूढकथांनी हे समीकरण चुकीचे ठरवले आहे. उत्तम गूढकथांमध्ये चांगले व्यक्ति-चित्रण, मनाची पकड घेणार्या कथानकाबरोबरच उत्कृष्ट वातावरण-निर्मिती, या सार्यांची एक स्वतंत्र आकर्षक शैली रहस्य निर्माण करणार्याकडे असावी लागते. आणि ही सर्व वैशिष्ट्ये रत्नाकर मतकरी यांच्या लेखनात असल्याचे वाचकांनीच मान्य केलेले आहे. अर्थात हे सगळे तात्त्विक चिंतन झाले. पण ज्याचा कुठल्याही गूढप्रकारावर विश्वास नाही, अशा माणसालाही हे पुस्तक सबंध वाचावेसे वाटेल. एवढी खात्री नक्कीच आहे.
-
Rangandhala (रंगांधळा)
मध्यरात्री त्याला अचानक जाग आली, ती कसल्यातरी 'खळ्ळ्' आवाजाने. अंधारातच त्याने खोलीभर नजर फिरवली. आणि एक गोष्ट लक्षात येऊन, त्याच्या छातीत धस्स झाले ! आवाज झाला होता, तो दरवाजाच्या कडीचा. त्याने पक्की लावलेली कडी आपोआप निघाली होती. आणि दार सावकाश उघडू लागले होते.... जागच्या जागी खिळल्यासारखा, जगन्नाथ ते दृश्य पाहत राहिला. दारात एक जख्ख म्हातारा उभा होता. बोडका. लांबुडक्या डोक्याला तुळतुळीत टक्कल पडलेले, चेहरा सुरकुत्यांनी मढलेला. गालाची हाडे वर आलेली, आणि अस्थिपंजर शरीर. डोळे मात्र निखा-यासारखे चमकत होते. नजर जगन्नाथवर रोखलेली होती. जगन्नाथने किंकाळी मारली, पण ती ओठातून बाहेर फुटलीच नाही. त्या बोडक्या म्हाता-याने त्याला आपल्याबरोबर चलण्याची खूण केली. जगन्नाथ चालू लागला. खरेतर त्याला जायचे नव्हते, पण स्वत:च्या इच्छाशक्तीवर जणू त्याचा ताबाच राहिलेला नव्हता. ....सर्व शक्ती एकवटून तिथून पळून जावे, असे वाटत होते, पण मनाचे सांगणे पाय मानत नव्हते. कुठे निघाले होते ते दोघे ? अगदी नेहमीच्या वास्तवातून उठवून, रत्नाकर मतकरी आपल्या वाचकाला एका अद्भुत प्रदेशात घेऊन जातात. गूढ, भयप्रद, अनामिक. त्यांचे बोट धरून वाचक झपाटल्यासारखा पानांमागून पाने उलटत जातो... तरुण मनाच्या वाचकांना संमोहित करणा-या, मतकरींच्या वैशिष्ट्यपूर्ण आगळ्यावेगळ्या गूढकथांचा संग्रह.
-
Khekada ( खेकडा )
'खेकडा' या कथासंग्रहातील बहुतेक सर्वच कथांमधून जे भय दाटून राहिलेले आहे, ते वाचकाला कडकडून दंश करणारे आणि जिव्हारी झोंबणारे आहे. या भयात वाचकाचे अवघे मनोव्यापार झपाटून टाकण्याची शक्ती आहे. या कथा वाचून अंगावर जो सरसरून काटा उभा राहतो तो दीर्घकाळ तसाच टिकून राहतो, कारण या कथा मूलभूत वास्तवाला कधी विसरत नाहीत. जसे 'तुमची गोष्ट' आरंभीच लेखक सांगतो, "ही तुमची गोष्ट आहे म्हणजे तुमच्याही बाबतीत घडू शकेल अशी" आणि शेवटीही निक्षून सांगतो, "तुमची म्हणून सांगितलेली ही गोष्ट तुमची नव्हेच. एक आपली शक्यता सांगितलेली एवढेच". पण तरीही या कथेत ज्या थरारक अनुभवांचे निवेदन आहे, त्याचा प्रभाव इतका विलक्षण आहे की अपराधाचा स्पर्श तुमच्या मनीमानसी नसूनही तुमच्या गळ्याभोवती फासाचा स्पर्श झाल्याची भावना तुम्ही अनुभवता. रत्नाकर मतकरी हे एक सिद्धहस्त कथाकार आहेत आणि या कथासंग्रहातील कथा मराठी भाषेत तरी दुर्मिळ अशा आहेत. या कथांचे अन्य भाषांतून अनुवाद झाले तर ते फक्त मतकरींचेच प्राप्त यश वृद्धिगंत करतील असे नव्हे, तर परिणामी मराठी भाषेलाही ललामभूत ठरतील.
-
Adam (अॅडम)
'अॅडम'चा नायक वरदाचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बर्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही "श्यामले'ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकरांशी संबंध ठेवून वरदाचे जिणे उद्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या "प्रेमा'ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या "निर्मले'कडून किचिंत्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
-
Antarbahya (अंतर्बाह्य )
मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणारया रत्नाकर मतकरी यांच्या गुढकथांचा ताजा संग्रह. भीतीच्या विविध स्वरूपांमधून मानवी मनाचे अथांग व्यापार शोधणाऱ्या आणि म्हणूनच मराठी कथा साहित्यात आढळपद मिळवणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांचा ताजा संग्रह .
-
Swapnatil Chandane
जेमतेम विशीचे असताना रत्नाकर मतकरींनी पहिली परिकथा लिहिली : "सोनेरी मनाची परी' अर्थातच, ती प्रेमकथा होती. एका तरुणानं, सगळ्या तरुणांसाठी लिहिलेली. त्या पाठोपाठ आल्या, या संग्रहातल्या इतर परिकथा- खरं तर प्रेमकथा. त्यांची कथनशौली अगदीच वेगळी. भाषा लयबद्ध, नादमधुर. इतकी चित्रदर्शी, की जसा एखाद्या गतीमान चित्रपटच आपल्या नजरेसमोर उलगडतोय. कुठं कुठं तर, छायाचित्रण केलेलं असावं तस, छायाप्रकाश आणि आकृती यांचे खेळ दिसतात. ही किमया मतकरींच्या शब्दांची. परीकथा केवळ मुलांसाठी नसतात. जे मनानं तरुण आहेत, ज्यांना जीवनातलं काव्य जाणवतं, सौंदर्याचा शोध घ्यावासा वाटतो, सुखदु:खाच्या सर्व छटांमध्ये रंगावंसं वाटतं, त्या प्रौढांसाठी, या जणू कथारूपानं सांगितलेल्या कविता आहेत. प्रेमाविषयीच्या. प्रेमातला अत्युत्कट आनंद, विरहाच्या असह्य वेदना, यांच्याही पलीकडे जाऊन, प्रेमातला त्याग, प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत, प्रेमामुळे झालेले अंतर्बाह्य बदल, अशा सर्वच प्रेमरंगांची गाथा आहे ही. आज, काल किंवा उद्या, प्रेमात पडणार्या प्रत्येकानं वाचलीच पाहिजे, अशी या शौलीतल्या, या एवड्याच कथा मतकरींनी लिहिल्या, आणि साचा मोडून टाकला. त्यांच्या एकूण लिखाणात असा दुसरा संग्रह नाही. एकूण मराठी वाङमयातच एकमेवाद्वितीय असा हा कथासंग्रह.
-
Phashi Bakhal
मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिलं, फासावर लटकावलं, हे मनाला खातच होतं. कुठंही दोरी दिसली, की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. माझं वागणं शहाणपणाचं नव्हतं, हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली, की ती रात्र डोक्यात फिरायची. आणि घरात सगळीकडे दो-या; चिकाच्या पडद्याला दोरी, ताक घुसळायला दोरी, अंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं, तर चांगला जाडजूड दोरखंड. त्या दोरखंडाचा गच्च फास कळशीभोवती आवळताना, ती रात्र डोळ्यांसमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडत सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचा. अधांतरी... फाशी गेलेल्या माणसासारखी. गूढकथेला मानवी मनाचे कंगोरे देणा-या आणि त्यामुळेच मराठी कथासाहित्यात अढळपद मिळवणा-या, रत्नाकर मतकरी यांच्या कथांचा आगळावेगळा संग्रह.