Msanvata (मसणवटा)
घकादायक शेवट हे या कादंबरीचे खास वैशिष्ठा. अनपेक्षितपणे शेवट आपल्यासमोर येतो. विजय-चंदा पाच भुयारांमधून जातानाची घटना वाचताना अंगावर काटा येतो. तसेच प्रत्येक वेळेस हाँसाका आणि तिचा संवाद आला, की अंगातून भीतीची एक लहर जाते. मातीतल्या माणसांची ही कथा, काही तरी सांगू पाहणारी, ऐकवणारी आहे. आपण नीट लक्ष देऊन ऐकले तर बरेच काही ऐकू येईल. तसे झाले तर लेखकाचा हेतू सफल होईल. कोयना धरणाच्या परिसरात या कादंबरीतली पात्रे राहतात. साहजिकच तिथली बोली. भाषा ते बोलतात. ही भाषा या कादंबरीत लेखकाने एकदम नेमकी पकडली आहे. या पात्रांचे एकमेकांशी संवाद इतके जिवंत झाले आहेत की, ती घटना आपल्यासमोर घडत आहे असे वाटते. साधी सोपी; पण खास गावरान, ठसकेबाज भाषा हे या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. त्यामुळे त्या प्रवाहात आपणही अलगद उतरतो. हा एक नक्कीच वेगळा प्रयत्न आहे आणि तो वाचकांना नक्की आवडेल यात शंका नाही