Filar (फिलर)

By (author) Jyotsna Devdhar Publisher Sukrut Prakashan

"कुणाला म्हणतेस ग मूर्ख ? आरसा बोलू लागला होता. कुणाला म्हणतेस गं मूर्ख ? तुझ्या मध्यमवर्गीय चौकटीतून बाहेर येण्याचा कधी प्रयत्न केलास ? शिकलीस, डीगऱ्या मिळवल्यास पण या चौकटीत स्वतः ला बंदिस्त करताना डोकं उंबऱ्याबाहेरच ठेवून आलीस. कशाची मिजास करणार आहेस ? कशाचा तोरा मिरवणार आहेस ? बाई गं बंड करायचं तर हात पाय मोकळे लागतात , जिभेला बोलता यावं लागतं. डोळ्यांना राग यावा लागतो. नीती अनीतीचे जुने धडे गिरवून नीतिमान होता येत नाही. नीती आतून यावी लागते. प्राणांतून जिचा हुंकार येतो ती नीती. परंपरागत चालत आलेले पाढे बे एके बे म्हणजे नितीनियामांचा गुणाकार नाही. प्रत्येक भावनेला भक्तीचा मुलामा द्यायचा. प्रत्येक विचाराला अध्यात्माचा रंग चढवायचा. यानं काहीही साधत नाही …" फिलर मधून

Book Details

ADD TO BAG