-
Ek Ghot Mrugajalacha (एक घोट मृगजळाचा)
'एक घोट... मृगजळाचा' या पुस्तकाची पहिली कच्ची प्रत विजयालक्ष्मीनं मला वाचायला दिली होती. एखादी कलाकृती किंवा चित्र बघताना बघणाऱ्याला ती वेगळीच भासते. त्यात त्या व्यक्तीचा वैयक्तिक दृष्टिकोन, नजरिया, विचार असतो. आपण त्या त्या व्यक्तीच्या त्या त्या नजरियाचा आदर बाळगलाच पाहिजे. मी त्या दृष्टिकोनातून या पुस्तकाकडे बघितलं आणि 'जैत रे जैत'च्या त्या जुन्या दिवसांच्या आठवणींमध्ये रममाण झालो. या पुस्तकाच्या निमित्तानं मला निश्चितच 'जैत'च्या शूटिंगच्या काळातील जुने दिवस आठवले. - डॉ. मोहन आगाशे
-
Ranbhuliche Pradesh (रानभुलीचे प्रदेश)
विजयालक्ष्मी मणेरीकर यांनी लिहिलेलं 'रानभुलीचे प्रदेश' हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. यामध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या अनेक रचनांविषयी अतिशय रसाळ पद्धतीनं मांडणी केलेली आहे. त्या रचनांचं संगीत आणि काव्य आणि त्या रचनांमध्ये किस्से, त्यातल्या संगीतामधले बारकावे हे अतिशय छान पद्धतीनं उलगडून सांगितलेलं आहे.