-
Saitanachi Khushi (सैतानाची खुशी)
राकेश भडंगची कविता विचारपरिप्लुत आहे; पण विचारजड नाही. तो सार्या जगाचे प्रश्न, भावभावना समजावून घेऊ शकतो आणि थेट मानवी अस्तित्वाच्या मुद्यालाच भिडतो. बिकट तत्त्वज्ञान वाटावे अशी ही गुंतागुंत तो कवितेच्या रेषांमधून सरळ मांडत जातो. त्यामध्ये हसण्याखेळण्याची कविता आहे, स्त्रीमुक्तीची कविता आहे, इसापाचीही कविता आहे... राकेश भडंगच्या कवितांचा हा पसारा वाचून त्याच्या आधुनिक दृष्टीचा प्रत्यय येईल आणि वाचकाची समजूत प्रगल्भ होईल...
-
Hatya ( हत्या )
एकेकाळचा नक्षलवाद आणि आताचा माओवाद... तर्हा एकच. नक्षलवादी जन्माला का येतात याची अनेक स्पष्टीकरणे वाचली गेली असतील परंतु त्यामागचा भावनातिरेक आणि तत्त्वज्ञानाचा आधार क्वचित कोणी असा उलगडून दाखवला असेल! तरुण पत्रकार मानव जगापुढे सत्य मांडावे म्हणून बंगाली वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश करतो. १९७०च्या दशकात नक्षलवादाचा छडा लावू पाहतो त्याला ज्या प्रकारच्या सत्यास सामोरे जावे लागते त्यामुळे त्याच्या मनात एका बाजूला वास्तव परिस्थितीविषयी आणि दुसर्या बाजूला प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याविषयी अनेक प्रश्न तयार होतात व तोच त्याची उत्तरे शोधत जातो.