-
Vijay Stambh (विजय स्तंभ)
रामायणप्रसाद वडिलांचा फोटो घेऊन बसे.वेगवेगळ्या कोनातून फिरवून बगत राही.अस्पष्टशी आकृती वरच्या बाजूला वळलेल्या आकडेबाज मिश्या स्पष्ट दिसत .तो फोटो कधी काळी स्पष्ट सुंदर असावा. थोडा आईच्या अश्रूंनी अस्प्ष्ठ केला व थोडा विजयस्तंभाच्या प्रभावाने. त्याने कल्पनेत जेव्हा जेव्हा वडिलांचा चेहरा पहिला , त्याचा डोळयासमोर विजयस्तंभ येउन उभा राहिला. आजोबांबरोबर विजयस्तंभाजवळ जाऊन तो विचारीत असे, "आजोबा , तुम्हांला असे नाही वाटत की हा विजयस्तंभ माझे बाबा आहेत . यांना एक धड आहे, एक चेहरा आहे, धडाला हातपाय नाहीत आणि चेहऱ्यावर नाकडोळे नाहीत ."
-
Mi Aani Mi (मी आणि मी)
हो मी मी व्यक्तीरिक्त काही बोलत नाही. मी ना समाजसुधारक आहे ना समाजसेवक. इतकेच नव्हे तर सामाजिक प्राणी सुद्धा नाही. माझ्या बाहेर जे काही घडतं ते माझ्या मी चा हिस्सा बनल्याशिवाय मी त्याला कागदावर उतरवू शकत नाही. सगळे कलाकार हेच करतात. जर ते खोट बोलत नसतील तर ! मी खोट बोलतो साहित्याबद्दल नाही तर मी लिहतो आपल्याबद्दल, ध्येयाचा शोध घेतो तो आपल्या पध्दतीने. मी माझ्या मी ची बाजू घेणारा आहे. अभिव्यक्त करणारा आहे. मी माझ्या मी वर प्रेम करणारा आहे. एकानिष्ठेने प्रेम फक्त स्वतावर केल जात.
-
Gallibol (गल्लीबोळ)
या देशात भ्रष्टाचाराविरूध्द बोलण सुध्दा पुन्हा आहे. बदलत्या काळात गुन्ह्याची व्याख्या बदलली आहे.अपराधी वाघासारखे छाती काढून फिरायला मोकळे आहेत. त्यांच्या विरुध्द बोट दाखवणाऱ्याला ते आपली शिखर समजतात . हे स्वातंत्र्य त्यांना सरकारने दिलं आहे कारण त्यांचा संबंध सतेच्या गल्ली -बोळापर्यंत आहे . सता जनतेच्या मतांवर मिळते . मतांसाठी ते कसा नोटांचा खेळ खेळवतात ते आता सर्वविदित आहे .
-
Indradhanushya Kshitijache (इंद्रधनुष्य क्षितिजाचे
सुमंतजींनी नवीन पार्टीच्या नेत्याचं अभिनंदन केलं आणि अध्यक्षांना आपल्या मंत्री मंडळाचा राजीनामा पाठवून दिला. इतकी वर्षे सत्ताधीश म्हणून मिळालेली प्रतिष्ठा इतक्या सहजासहजी धुळीला मिळेल? राजमहलातून रस्त्यावर आल्यावर लोक त्यांच्याशी कसा व्यवहार करतील? पार्टीतले त्याचे सहकारी मंत्री, राज्याचे पदाधिकारी, सरकारी मोठे अधिकारी, भावी सत्ताधीश त्याच्याशी कसे वागतील? खुर्ची गेल्यानंतर त्यांची दिनचर्या काय असेल? आज जी गर्दी त्यांच्या भोवती जमते यापुढे तशी जमेल का?......