-
Eka Yakshache Akshaygan (एक यक्षाचे अक्षयगान)
अविनाश टिळक यांची आई कर्करोगाशी झुंज देऊन १७ सप्टेंबर १९७४ रोजी कालवश झाली. त्यांचे वडील-दादा - त्यानंतर अकरा वर्षांनी, २१ जुलै १९८५ रोजी निधन पावले. दादांनी स्वतःचा मृत्यू होईपर्यंत आपल्या स्वर्गस्थ पत्नीशी रोजच्या रोज जो लिखित पत्रसंवाद साधला त्याचे मूर्तरूप म्हणजे हे पुस्तक. दादांनी दोनशे पाणी वह्यांचे एकूण चोवीस भाग लिहिले. त्यात चार हजार पृष्ठे भरतील एवढा मजकूर आहे. माहिती, हकीगत, मुक्तचिंतन, व्याकुळता, विरहभाव, पश्चात्तापदग्धता अशा विविध विचार-भावनांनी भरलेल्या या संवादपुस्तिका म्हणजे पत्नीवियोगाने भारावलेल्या पतीचा स्मृतीयज्ञच होय; त्यात यक्षाच्या विरहगानाची आर्तता आहे...