-
Haravaleli Trophy Aani Itar Katha (हरवलेली ट्रॉफी आणि इतर कथा)
'शारदा सहनिवास' म्हणजे सतत काही ना काही उलथापालथ चालू असणारं जग. त्यात सगळ्यात भाव खाणार्या गोष्टी म्हणजे बॅडमिंटनचा खेळ अन् गणेशोत्सवाचं नाटक. ‘आंतर सहनिवास बॅडमिंटन करंडक' शारदा सहनिवासने कसा जिंकला ? तो करंडक हरवला कसा ? अन् त्याचा शोध कसा लागला ? या सार्याचा गणेशोत्सवाच्या नाटकाशी काय संबंध ? दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या खुसखुशीत, खमंग शैलीत उलगडलेल्या धमाल अन् कमाल आठवणी !
-
Mazya Dhammal Goshti (माझ्या धम्माल गोष्टी)
तो मुलगा धडपड्या आहे. चौकस आहे, पण भोचक नाही. त्याचं घर, त्याचं कुटुंब, शेजारीपाजारी, त्याची शाळा, त्याचे शिक्षक-शिक्षिका, त्याचे वर्गातले अन् सोसायटीतले मित्रमैत्रिणी या सगळ्यांनी भरलेलं त्याचं जग. त्याच्या या छोट्याशा जगात घडणाऱ्या अफलातून घटना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि साहित्यिक दिलीप प्रभावळकरांनी खास त्यांच्या मिष्कील शैलीत उलगडलेल्या आपल्या बालपणीच्या आठवणी...
-
Patrapatri (पत्रापत्री)
आपल्या आजूबाजूच्या घटनांचा तिरकस लेखणीतून घेतलेला वेध... हे या पत्रापत्रीचं स्वरूप. तात्यासाहेब आणि माधवराव या जोडगोळीच्या साहाय्याने दिलीप प्रभावळकर हा पत्रप्रपंच मांडतात. यात कधी या दोघांचा रशियावारीतला पराक्रम हसवतो; तर कधी आफ्रिकावारीतले 'उद्योग' हसू आणतात. याच पत्रांतून कधी आयपीएलवरचं भाष्य समोर येतं, तर कधी होर्डिंग्जच्या सुळसुळाटासंबंधीचं तिरकस मत.. तात्कालिक घटनांकडे पाहण्याचा प्रभावळकरांचा मिस्कीलपणा आणि या जोडगोळीची धम्माल यासाठी वाचावं असं ...
-
Bokya Satbande Bhag 9 ( बोक्या सातबंडे भाग : ९)
बोक्या सातबंडे चा हा नववा भाग अतिशय सुरेख , प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणार दिलीप प्रभावळकर यांचं हे एक झकास पुस्तक !
-
Bokya Satbande Bhag 8 ( बोक्या सातबंडे भाग : ८ )
बोक्या सातबंडे चा हा आठवा भाग अतिशय सुरेख , प्रसन्न विनोदाचा शिडकावा करणार दिलीप प्रभावळकर यांचं हे एक झकास पुस्तक !
-
Balnatika Ani Ekpatrika (बालनाटिका आणि एकपत्रिका)
"आज तुमच्यासाठी एक फर्मास भेट आणली आहे.दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्या नाटिकांच्या आणि एकापात्रिकांच्या पुस्तकाची.अगदी बालवयापासून अभिनयाचा,लेखनाचा 'छंद' जोपासला.म्हणूनच ते आज नामवंत कलाकार,लेखक होऊ शकले.छोट्या दोस्तांनो !तुम्हीही तुमच्यातील कलागुण वाढवा आणि खूप खूप मोठे व्हा.आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद ! "
-
Eka Kheliyane ( एका खेळीयाने)
मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले . पुस्तकाची प्रूफं चाळताना एकदम वाटून गेलं. हे आपण खरंच इतकं केलं का ? काय नातं आहे या पात्रांशी ? आता वाटतं मी केलं नाही . ते झालं आपोआप आपापली व्यक्तिमत्व, स्वभाव आणि सारी वैशिष्ट्यं घेऊन हि पात्रं उभी राहिली. विविधरंगी , माझ्याशी काही साम्य नसलेली . मनात येतं जमा झाले हे चित्रविचित्र नग माझ्याभोवती , तर सर्जक असूनही मीच त्यांच्यात फार उपरा, अपरिचित , अनोळखी आणि मावळ वाटेन ! ते सगळे आणि मी यांचा परस्पर संबंध आजही मला बऱ्याचदा कोड्यात टाकतो ! ' एका खेळीयाने ' ही पाचवी सुधारित आवृत्ती , नवीन भूमिकांवरील नवीन लेखसंग्रह.