-
Pathlag Aani Itar Katha (पाठलाग आणि इतर कथा)
राजू फिरके हा कनसाई या छोट्या गावातील फिरके गुरुजी आणि शांताबाईंचा शाळकरी मुलगा. त्याला विज्ञानात नुसती रुचीच नाही, तर त्याच्याकडे अपार जिज्ञासा, हुशारी, धाडसीपणा आहे. त्याच्या या गुणांमुळे तो अनेक कारनामे उजेडात आणतो. कधी त्याच्याच गावातले किंवा कधी त्याच्या आप्पा-काकूंच्या रनाळा गावातले किंवा दुसर्या आप्पा-काकूंच्या आष्टा गावातले. कधी तो परग्रहावरून पृथ्वीवर मूलद्रव्यं चोरायला आलेल्या परग्रहवासीयांचा पर्दाफाश करतो. तर कधी मोबाइलवर ऐकलेल्या संभाषणावरून बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावतो. तर कधी एखाद्या विवराचं रहस्य उघड करतो. तर कधी एखाद्या योगी पुरुषाचं ढोंग उघडकीला आणतो. अर्थातच या सगळ्या घटनांचा विज्ञानाशी संबंध आहे. हे सगळं करताना त्याच्या मदतीला असतो त्याचा आयुकात शास्त्रज्ञ असलेला किरणमामा, शिवाय विज्ञानलेखक अरुण घाटे आणि अन्य शास्त्रज्ञ मंडळीही त्याच्या मदतीला येतात. काही वेळेला त्याची चुलत भावंडंही असतात त्याच्याबरोबर. तर राजूची हुशारी आणि त्याची मानवता यांचं लोभस दर्शन घडविणारी, कुमार मित्रांना नक्कीच आवडेल अशी ही सचित्र विज्ञानमालिका.
-
Durche Pravasi Ani Pravasi Itar Katha (दूरचे प्रवासी आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. रनाळ्यात एकदा रात्रीच्या वेळी पाहिली त्याने अद्भुत चकती, चकतीतून त्या उतरल्या सहा विचित्र आकृत्या, पडक्या घराभोवती फिरू लागल्या. राजूने लावला छडा त्या आकृत्यांचा. एकदा रनाळ्यातच रात्रीच्या वेळेला राजूला तळ्यात सापडला एक अद्भुत जीव, ज्याच्यातून प्रकाश बाहेर येत होता. राजूने शेवटी जाणूनच घेतलं त्या जिवाचं रहस्य. एकदा रनाळ्यात झाली ढगफुटी; पण राजूने सगळ्यांना वाचवलं त्या संकटातून. आष्ट्याला एकदा गेला असताना रात्री त्याला शेतात उतरताना दिसलं एक यान. त्या यानातून चार काळसर आकृत्या बाहेर पडल्या; पण त्या विघातक नाहीत हे राजूने त्यांच्या स्पर्शातून जाणलं. तर अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी.. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Avakashatil Doot Ani Itar Katha (अवकाशातील दूत आणि इतर कथा)
राजू आमचा आहे हुशार. विज्ञानाची त्याला आवड फार. कनसाई गावाची तो आहे शान. राजूला एकदा सापडला एक विचित्र धोंडा. त्या धोंड्याची मग राजूने केली शहानिशा. राजू एकदा गेला प्रतापगडावर. अफजलखानाच्या वधाची घटना प्रत्यक्ष घडताना पाहिली त्याने डोळ्यांसमोर. त्याच्यामागचं विज्ञान जाणून घेतलं राजूनी. राजूला रानात सापडली एक अळी. मग नेहमीच्या पद्धतीने त्याने घेतला तिचा विज्ञानातून शोध. कनसाई गावात अमावस्येला घटना घडत होत्या भीतिदायक. राजूने एका चिमणीच्या माध्यमातून त्या घटनांचा घेतला वेध. अशा या राजूच्या करामती. त्याला विज्ञानाची आहे संगती. त्याचा आयुकातील शास्त्रज्ञ किरणमामा आणि विज्ञान क्षेत्रातील, पोलीस खात्यातील मंडळी नेहमीच उभी त्याच्या पाठीशी. गूढ वातावरणातून उलगडणारं विज्ञान, त्याच्या जोडीला रंगीत चित्रं छान. राजूची ही हुशारी आणि मानवता, आवडेल खास आमच्या कुमार दोस्तांना.
-
Third Man (थर्ड मॅन)
डॉ. संजय ढोले हे सध्याच्या घडीला विज्ञानसाहित्यातील आघाडीचे विज्ञानकथालेखक असून, त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हा ‘थर्ड मॅन’ नावाचा विज्ञानकथासंग्रह साकारला आहे. त्यांच्या विज्ञानकथा या विज्ञानाच्या मध्यवर्ती कल्पनांचा आविष्कार असून, सैद्धान्तिक, प्रायोगिक व भविष्यातील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वेध घेणार्या स्वतंत्र कलाकृती आहेत. त्यांच्या कथा प्रस्थापित विज्ञानाचं बोट धरून पुढे जातातच; पण त्याच वेळी भविष्यातील येऊ घातलेल्या विज्ञानाचा परामर्श घेणार्याही आहेत. डॉ. ढोले यांनी विज्ञानकथेत भौतिकशास्त्र, जैवशास्त्र, किरणशास्त्र व इतर आंतरशाखीय शास्त्रांचे विषय हाताळले असून, लालित्याचा सक्षमपणे आधार घेऊन, त्या वाचकांपर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं आहे. ‘थर्ड मॅन’ ही कथा भविष्याचा वेध घेणारी असून, ‘उपरा’ व ‘मोकळं अवकाश’ या कथा अंतराळाचा ठाव घेणार्या आहेत. शिवाय ‘अंधारातील डोह’ व ‘ट्रीटमेंट’ या कथा वैद्यकीय शास्त्रातील घडामोडींशी निगडित असून, ‘नि:पात’ आणि ‘मागोवा’ या मानवी जनुकाशी नातं सांगणार्या आहेत. तर ‘दरड’ ही तंत्रज्ञानाचा पुरावा देणारी आहे. डॉ. ढोले यांच्या सर्वच कथा विज्ञानाशी नातं सांगणार्या असून, प्रवाहित व रोमहर्षक आहेत. म्हणूनच या निश्चितपणे वाचकांच्या मनाचा ठाव घेऊ शकतील.
-
Rafinu (राफिणू)
कनसाई गावात होतो कोरोनाचा प्रवेश... त्याच गावातील फिरके गुरुजींचा चुणचुणीत, हुशार, जिज्ञासू मुलगा राजू इतरांसह करतो कोरोनाग्रस्तांना आणि इतर गावकर्यांना मदत... आपल्या ड्रोनचा वापर करून तो आजारी लोकांसाठी मागवतो औषधं...शेजारच्या गावातील लाकोंना एका वनस्पतीचा रस घेतल्याने कोरोनापासून मुक्ती मिळाल्याचं समजतं त्याला... शेजारच्या गावातल्या माणसाला मदतीला घेऊन तो जातो ती वनस्पती माहीत असणार्या आदिवासींकडे...ती वनस्पती घेऊन त्याचा प्रयोग करतो कनसाई गावातल्या रुग्णांवर आणि ते होतात कोरोनामुक्त...तो आपल्या किरणमामाची आणि त्या आदिवासींची घालून देतो भेट... तेव्हा त्या दोघांनाही कळतं की ते कुणी आदिवासी नसून आहेत परग्रहवासी... परग्रहवासीयांकडून वनस्पती घेऊन डॉक्टर किरण देतात औषध निर्माण करणार्या विविध कंपन्यांना...त्यातून वेगळ्या केलेल्या रेणूला नाव दिलं जातं राफिणू (राजू फिरके रेणू)... या कामासाठी राजूचा पंतप्रधानांच्या हस्ते होतो सत्कार...
-
Khujaba (खुजाबा)
या विज्ञान कथासंग्रहा बारा कथा आहेत आणि प्रत्येक कथा ही स्वतंत्रपणे विज्ञान संकल्पना घेऊन पुढे आलेली आहे. या कथांमध्ये विज्ञान हाच खरा नायक असल्याने, विज्ञानाचा परिसस्पर्श जागोजागी जाणवेल यात शंका नाही. शिवाय, मूळ विज्ञानाच्या वाईटसाईट गोष्टींची उकल झाल्याचे निश्चितच दिसेल. ‘अपहरण’ ही कथा संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज या तंत्रज्ञानाच्या मुळाशी जाणारी व त्याचा व्याप मांडणारी आहे. तर ‘आगंतुक’ ही कथा अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाचा उपयोग करून मानवाला संजीवनी देणारी व मानवी स्वभावाचे विघातक दर्शन घडवणारी आहे. तसेच, ‘साक्षीदार’ ही कथा मृत व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती संचयाचे चित्रण करणारी आहे. ‘अज्ञात जीवाणू’ ही कथा जीवाणूंच्या डीएनए व जनुकांचा अभ्यास करताना, परग्रहावरील जीवाणूच्या शोधाचा परिपाक आहे. विविध विज्ञान संकल्पनांतून साकारलेल्या रंजक कथांचा वाचनीय संग्रह.
-
Dimbhak (डिंभक)
नॅनो तंत्रज्ञानाद्वारे मृतांना जिवंत करण्याचा प्रयोग... मृत माणसाच्या मेंदूचं रोपण जिवंत कुत्रीच्या शरीरात करणे... भविष्यात नेऊ शकणारी खुर्ची आणि एका राजकीय नेत्याने तिचा केलेला गैरवापर... शिशाच्या अणूचे सोन्याच्या अणूमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी झाल्याने मालामाल झालेला शास्त्रज्ञ ...परग्रहावरील डिंभक...पिंजकांमुळे लाभलेल्या अदृश्य होण्याच्या शक्तीमुळे एका शास्त्रज्ञाने अतिरेक्यांचा केलेला खात्मा...क्लोननिर्मिती...गर्भाबरोबरच वाढणाऱ्या ट्यूमरला शास्त्रज्ञाने दिलेली मात...ग्राफीनच्या कणांवरचं संशोधन...विशिष्ट प्रयोगाद्वारे खुन्यांपर्यंत पोचणारा शास्त्रज्ञ...एक विचित्र कीटक...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांचा सदुपयोग, दुरुपयोग करणारे शास्त्रज्ञ...त्यातून घडणारं मानवी मनाचं दर्शन... वैज्ञानिक संकल्पना आणि मानवी मन यांच्या गुंफणीतून साकारलेल्या रंजक विज्ञान कथांचा वाचनीय संग्रह.
-
Premacha Renu
विज्ञानकथा या मनोरंजनासोबतच सामाजिक प्रबोधनासाठीही लिहिल्या गेल्या पाहिजेत, असे मानणा-या डॉ. संजय ढोले यांचा हा कथासंग्रह निश्चितच वाचकांची बौद्धिक पूर्तता करेल. कथेच्या माध्यमाद्वारे विज्ञानातील गुंत[...]