Tila Tila Dar Ughad (तिळा तिळा दार उघड)

By (author) Tara Vanarase Publisher Popular Prakashan

क्षण-व्यवसायाने डॉक्टर असणार्‍या ह्या लेखिकेचे कथासंग्रह, कादंबरी, नाटक, काव्य असे सगळे साहित्य दर्जेदार आणि मोजके आहे. ह्या पुस्तकातील प्रवासवर्णने ही साहित्याच्या माध्यमातून केलेल्या प्रवासाची क्षणचित्रे आहेत. ज्यातून ती करत असलेला प्रवास आणि तिच्या आवडत्या साहित्यिकाचा खूप जवळून परिचय वाचकाला होतो तिळा तिळा दार उघड.... सुरूवातीचा हा वेचा.... "ब्रॅडफर्डच्या आडवळणी रस्त्यांमधून कधी उजव्या हाताला, तर कधी डाव्या हाताला झुकांड्या घेत बस धिम्या चालीनं नेटाचा मार्ग काढीत राहते तेव्हा तिला काही दिशा असेल, मुक्काम गाठायची निकड नसली तरी इरादा असेल असं वाटतच नाही. गोलगोल फिरून आपण निघाल्या ठिकाणी परतणार असा संशय वाटायला लागतो. इतक्यात समोरच्या खिडकीतून उजव्या बाजूला जाणारा रस्त्याचा फाटा दाखवणारी बी ६१४४ हॉवर्थ अशी पाटी दिसते. आणि बस आपला अवजड देह सांभाळत नेमकी त्याच दिशेला मोहरा फिरवते तेव्हा हायसं वाटतं. मग मी जरा नीट सावध होऊन बसते. दोन्ही बाजूंच्या समोरच्या खिडक्यांतून दिसणार्‍या धावत्या दृश्याकडे पाहू लागते. माझ्या छातीत धडधड सुरू होते. या प्रवासाची मी फार फार वर्षं वाट पाहिती आहे. आता काही हरवायला नको, निसटायला नको."

Book Details

ADD TO BAG