-
Chanakya (चाणक्य)
इ. स. पूर्व 300 वर्षापूर्वीची ही कहाणी. त्यावेळी भारतात अनेक गणराज्य नांदत होती. परंतु त्यांच्यात एकमेळ नव्हता. आपापसात सतत संघर्ष होत होती. मगध हे त्यांपौकीच एक ! त्या राज्याचा राजा धनानंद हा विलासी राजा होता. अतोनात कर लावून तो प्रजेची पिळवणूक करीत असे. त्याच्या अनियंत्रित कारभाराला प्रजा कंटाळली होती. चाणक्य विष्णुगुपत हा त्या राज्यातील एक तेजस्वी ब्राह्मण. तक्षाशिलेला जाऊन विद्यासंपन्न झालेल ! राजाचा दानाध्यक्ष या नात्यानं काम करताना धनानंद राजानं त्याचा अपमान केला. ते पाहून चाणक्यनं शपथ घेतली की, उन्मत्त धनानंद राजाचं सिंहासन मी यथावकाश उलथून टाकीन.' त्याच वेळी जगज्जेता बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ग्रीक सेनानी सिकंदर यानं भारतावर आक्रमण केलं. चाणक्यानं अपार परिश्रम करून सिकंदराचं आक्रमण थोपविण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्याचीच परिणीती म्हणून सिकंदराला भारतविजेता न होता परतावं लागलं. चंद्रगुप्ताला हाताशी धरून चाणक्यानं त्याला उत्तम शिक्षण दिलं. अनेक तेजस्वी तरुणांची एक मळी उभी केली आणि अनेक युक्त्या-प्रयुक्त्या योजून त्यानं धनानंद राजाला पदच्युत केलं. त्याच्या सिंहासनावर चंद्रगुप्त मौर्याला अधिष्ठित करून त्याच्याच सहाय्यानं चाणक्यानं एकसंध, बलसंपन्न आणि अखंड भारत निर्माण केला. आपल्या आयुष्याच्या उतरार्धात "कौटिलीय अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहून भारतीय साहित्यात अनमोल भर घातली. अशा या नृपनिर्मात्या युगंधर क्रांतिकारी महापुरुषाच्या जीवनावरील ही ललितरम्य कादंबरी अनेक नाट्यपूर्ण, रहस्यमय प्रसंगांनी सजलेली ! प्रचलित असलेल्या 'चाणक्यनीती'च्या आणि प्रसिद्ध असलेल्या 'कौटिल्याचे अर्थशास्त्र'च्या 'चाणक्य'वर संदर्भांचा छडा लावून लिहिली गेलेली ही कादंबरी. स्वत: सत्तेपासून अलिप्त राहायचे पण सत्ता परकीयांच्या हातातून दिसणार नाही म्हणून डावपेच रचायचे, त्यासाठी एखाद्या चंद्रगुप्ताला अगदी श्रीगणेशापासून तयार करायचे न् प्रजाहित साधण्याचा प्रयत्न करायचा हे सारेच अजब आहे म्हणूनच अशी व्यक्तिरेखा लेखकालाही आव्हानात्मक आहे, असे मूळचेच जबरदस्त कथानक लेखकाचीही परिक्षा घेणारे आहे अर्थात भा. द. खेर ह्यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ लेखकाला हे शिवधनुष्य न पेलवते तरच नवल ! खेर ह्यांनी ते कसे समर्थपणे पेलले आहे हे एकदा वाचलेच पाहिजे असे आहे.
-
kan kan Shan Shan (कण कण क्षण क्षण)
कण कण क्षण क्षण या पुस्तकामध्ये साहित्यिका: गिरिजा कीर यांच्या जीवनातील काही सकारात्मक आठवणी त्यांनी लिहिल्या आहेत.
-
Get Out Of Your Own Way (गेट आऊट ऑफ युअर ओन वे)
यश आणि आनंद मिळण्यापासून आपणच आपल्याला बर्याचदा दूर ठेवत असतो. आपणच आपल्या मार्गातील अडथळा बनत असतो. स्व-पराजय करणारी आपली वागणूकच याला कारणीभूत असते. ही वागणूक कशी तयार होते याबाबत हे पुस्तक सांगतं. हे पुस्तक आपल्याला या वागणुकीच्या मुळाशी कोणत्या भावना असतात तिथपर्यंत घेऊन जातं. बर्याचदा याची मुळं आपल्या बालपणात सापडतात. स्व-पराजय करणार्या या वागणुकीवर मात कशी करावी, यासाठी पुस्तकातील प्रत्येक प्रकरणात उपाय किंवा तोडगे दिलेले आहेत. ‘स्व-पराजय करणारी वागणूक ते समृद्ध करणारी वागणूक’ हे रूपांतरण घडवून आणण्यासाठीचा अॅक्शन प्लॅन या पुस्तकाच्या रूपाने तुम्हाला मिळेल. अतिशय मौल्यवान पुस्तक. स्व-पराजय करणार्या 40 वागणुकी या पुस्तकातून स्पष्टपणे कळतात आणि त्यांच्यावर मात कशी करायची यासाठी अतिशय प्रॅक्टिकल उपायही मिळतात. आनंदाच्या मार्गातील अडथळे दूर करून तुम्हाला हवं तसं जीवन जगण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचा. - जॅक कॅनफिल्ड, ‘चिकन सूप फॉर द सोल’चे सहलेखक लेखकांविषयी मार्क गुल्स्टोन, एम.डी. हे बोर्ड-सर्टिफाईड मानसोपचारतज्ज्ञ अ बर्कले, बोस्टन युनिव्हर्सिटी, द मेनिन्जर फाउंडेशन, आणि यूसीएलए इ घेतलं आहे. ते न्यूरोसायकिअॅट्रिस्ट युनिव्हर्सिटी इथे असिस्टंट क्लिनिक आहेत. लॉस एंजेलिस बिझनेस जर्नल आणि स्पेन डेली न्यूज यामध्ये स्तंभलेखन करतात. पुस्तकाचे सहलेखक फिलीप गोल्डबर्ग यांनी अने लेखन तसेच सहलेखन केले आहे.
-
Adoption Ek Good News (अडॉप्शन एक गुड न्युज)
अँडॉप्शन' एक गुड न्यूज!' हे पुस्तक मराठी ग्रंथ संसारामध्ये अनेक अर्थानी फार महत्त्वाच ठरणार आहे असं मला वाटत. 'अँडॉप्शन'' या शब्दाच्या भोवती खूप साऱ्या भावना आहेत. एक भावना स्वीकाराची आहे, तर द्सरी भावना स्वत:ने आतापर्यत मानलेलं न्यूनत्व पूर्ण करण्याची. तिसरी भावना अनन्य अशा संगोपनाची आहे. याच्या पलीकडे जाऊन एक भावना निरपेक्ष वात्सल्याचीही आहे. म्हणजे इतक्या सान्या भावछटा 'अडॉप्शन' शब्दाभोवती आहेत. ज्यांच्यासाठी तो एक प्रवास आहे, ती प्रक्रिया आहे, अशा मनांना काय वाटत असेल? नेमकं हे शोधण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये आहे. आणि वाचताना प्रत्येक संवेदनाक्षम वाचकाला असं जाणवेल, की या निव्वळ कुणी व्यक्ती बोलत नसून त्यांच्याद्वारे माणूसकी बोलतेय. मला असं वाटतं, माणसामध्ये असलेल्या आस्था, संगोपन, वात्सल्य, स्वीकार या सारख्या उन्नत भावनांना खत पाणी देण्यासाठी म्हणून या 'अँडॉप्शन', प्रक्रियेचा जन्म झाला असावा. आणि म्हणूनच हे पुस्तक वाचतांना पदोपदी, शब्दोशब्दी आपल्याला जाणवेल की 'अॅडॉप्शन' ही 'गुड़ न्युज' का आहे कारण ती 'माणूसकीसाठीची गुड न्यूज' आहे ! डॉ आनंद नाडकर्णी ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ