-
Hrudyarog Aani Aapan ( हृदयरोग आणि आपण )
ह्रदयविकारासंदर्भात अथपासून - इतिपर्यंत असे या पुस्तकाचे सार्थ वर्णन करता येईल. हार्ट अटॅक आल्यावर पहिल्यांदा ताबडतोब काय करावे, अचानक ह्रदय बंद पडल्यास ( कार्डिऍक अरेस्ट) कोणती पावलं उचलावीत, ह्रदयविकार असणाऱ्यांचा आहार, व्यायाम, इतकच नाही तर इसीजी, इको टेस्ट, कलर डॉपलर, अँजिओप्लास्टी, बायपास यासारख्या तांत्रिक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत समजावून दिल्या आहेत. ह्रदयविकारावरील इतक्या सांगोपाग पद्धतीने लिहिलेले हे पहिलेच पुस्तक म्हणावे लागेल. हे पुस्तक ह्रदयविकारासंदर्भातील आपले अनेक गैरसमज दूर करते, आपल्याला शास्त्रशुद्ध माहिती देते. शिवाय प्रतिबंधक स्वरूपाचे कार्यही करते. एका निरामय, सुदृढ, आनंदी जीवनासाठी हे पुस्तक म्हणजे मार्गदर्शक आहे.
-
Punha Ekada Aavaghad Afghanistan ( पुन्हा एकदा अवघ
अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमधील शीतयुद्धात भरडल्या गेलेल्या अफगाणिस्तानची घडी आजही व्यवस्थितपणे बसलेली नाही. पत्रकार निळू दामले यांनी २००३ मध्ये या देशात फिरून त्याचे रिपोर्ताज ‘अवघड अफगाणिस्तान’ या पुस्तकाच्या माध्यमातून मांडले होते. याच सुमारास तालिबान्यांचा पाडाव झाल्याने तेथे शांतता नांदेल, अशी अटकळ जगभरात व्यक्त होत होती. मात्र, अनेक जमातींमध्ये विभागल्या गेलेल्या आणि सांस्कृतिक-धार्मिक कल्पनांमध्ये रूतलेल्या अफगाणिस्तानवर आजही तालिबान्यांचा प्रभाव आहे, हे दामले यांना त्यांनी २००७ साली केलेल्या या देशाच्या दुसर्या यात्रेत आढळले. या यात्रेदरम्यानचे अनुभव आणि अफगाणिस्तानवरील अन्य मजकुराचा अभ्यास करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. तालिबानींच्या अस्तित्वामुळे अमेरिकी फौजांना तेथून पूर्णपणे माघारी जाणे अशक्य असल्याने अफगाणिस्तानचे आणि तालिबान्यांच्या प्रभावाखाली असलेल्या पाकिस्तानचे भवितव्य काय, हे सांगणे कठीण आहे, हा त्यांनी काढलेला निष्कर्ष अस्वस्थ करतो.