-
Piece Of Cake
वय वर्षे 13 : 'बाटा'च्या दुकानात 'मेन्स सेक्शन'मध्ये बुटांची खरेदी. वय वर्षे 15 : दातांना हिरव्या रंगाच्या ब्रेसेस आणि डोळ्यांना चष्मा असलेल्या मुलानं मैत्री सोडली. वय वर्षे 26 : नेभळट जग्गू 'बॉस' म्हणून मिळाला. वय वर्षे 29 : 'हिंदुस्थान टाइम्स'च्या 'विवाह विषयक' जाहिरातीत 'किरकोळ' विभागात प्रथमच आलेली छोटी जाहिरात. मीनल शर्मा, एमबीए, वय वर्षं एकोणतीस, उंची पाच फूट दहा इंच; जरा अधिकच कार्यान्वित झालेली सदसद्विवेकबुद्धी आणि ऐटबाजपणा. मीनलला सगळं काही पाहिजे. इंटरनॅशनल फूड्समध्ये यशस्वी 'करिअर', करिअरला जुळणारी जीवनपद्धती आणि एक 'कूल' तरुण, जो तिला हि-यांचे दागिने देईल, फुलं देऊन स्वागत करेल आणि तिच्या विनोदांना हसून दाद देईल, असा. पण तिच्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या ओशाळवाणं करणा-या घटनांकडे नजर टाकली, तर हे सगळं तेवढं साधंसोपं नाही हे लक्षात येतं. विशेषत: जेव्हा तिच्या आईनंच तिचं लग्न जमवायला पुढाकार घेतलाय आणि मीनलला आता आयुष्याचा जोडीदार निवडताना एक तल्लख पण कंटाळवाणा कॅन्सर स्पेशालिस्ट आणि वादळी व्यक्तिमत्त्वाचा 'सेक्सी' रेडिओ जॉकी हे दोन पर्याय आहेत. भरीत भर म्हणून तिचा एक खोडसाळ बालमित्र आहे, आता तिचा सहकारी, जो तिचं 'करिअर' बरबाद करण्याची संधी दवडू इच्छित नाही. खोडकरपणानं भरलेली ताजीतवानी कथावस्तू वाचकाला प्रफुल्लित करत उत्सुकतेनं पानं उलटवीत ठेवते, पुस्तक वाचून पुरं होईपर्यंत...
-
The Waking Call
कॉर्पोरेट वर्ल्ड, कॉलसेंटर, ग्लोबल इकॉनॉमी, कटथ्रोट कॉम्पिटीशन यामुळे गतिमान झालेल्या अर्थव्यवस्थेवरील वेगवान शैलीतील, वाचकांना अंतर्मुख करणारी कादंबरी
-
Kay Tujya Manat?
बाईचं मन...एक अथांग डोह... बाईपण सुरु होताना... बाईपण सिद्ध होताना... बाईपणाच सार्थक वैगरे होताना... बाईपणातून सुटताना... बाईपणाचं ओझं पेलताना... बाईपणाचा अभिमान मिरवताना... आधुनिक बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावरचे तिचे मनोव्यापार रेखाटणारं पुस्तक 'काय तुझ्या मनात?' वाचायलाच हवं प्रत्येक प्रौढ बाईनं. बाईच्या सहवासातल्या पुरुषानं.
-
Tottochaan (तोत्तोचान)
तोत्तोचान (स्वतः लेखिका) ही एक चंचल, शाळेतून काढून टाकलेली, खोडसाळ (?) शिक्षकांसाठी पण तरीही कुतूहलपूर्ण, उत्तम सामाजिक जाण असलेली प्रेमळ, आनंदी, धडपडी आणि निरागस चिमुरडी आहे. तिचं लहानपणीचं भावविश्व, तिचे पालक, लाडकी "तोमोई' शाळा आणि तिचे अनोखे मुख्याध्यापक कोबायाशी, त्यांचे शिक्षणविषयक नावीन्यपूर्ण उपक्रम, तळमळ, मुलांवरचा अतीव विश्वास...हे सारं आणि अजून खूप काही सांगणारं "तोत्तोचान.' (मूळ लेखिका : तेत्सुको कुरोयानागी, अनुवाद : चेतना गोसावी) कोबायाशींच्या मते, सगळी मुलं स्वभावतः चांगलीच असतात. तो चांगुलपणा रुजवणं आणि मुलांची वैयक्तिकता टिकवणं महत्त्वाचं असतं. स्वाभाविक व नैसर्गिक वाढीसाठी मुलांना शिक्षणाबरोबरच क्रीडा, संगीत निसर्ग, चित्रकला यांच्या जोडीला मुलांवर अथांग प्रेम करणारे पालक व शिक्षक मिळणं फार गरजेचं आहे. शाळांचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकमुक्त असावा, शिक्षण हसत-खेळत चालावं, असं त्यांना वाटे. तोमोई शाळेतले अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, गमती आपल्या शिक्षणपद्धतीत कदाचित अति आदर्शवादी वाटतील; पण तरीही शिक्षणासंबंधी प्रेम, आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचलंच पाहिजे,असं हे पुस्तक!
-
Makeup Utarvalyavar
काळ बद्दला! स्त्री ची अनेक नवी रूप जागासमोर आली परि स्थितीला टक्कर दे ण्याची तिची क्षमता चकित करू लागली. कुटुंबाच्या जवाबदारया पेलत. ती अवघं आकाश कवेत घेऊ लागली. तिच्या हळूवारपणाला कणखर तेची जोड लाभली. आणि तिच्या ठायी पारंपरिकतेचा अधुनिकतेचा अपूर्व संगम घडून आला.