-
Angat Pangat (अंगत पंगत)
‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात. कोटी (शाब्दिक), लेखनासंबंधीचं मार्गदर्शन, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी लागणारी माणसाची पात्रता, लायकी, भुताखेतांच्या गोष्टी, भविष्याचा नाद, नाव (माणसाचं), सत्याविषयीचं भाष्य, पोकळ देशभक्ती, व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, मास्तरांची बाजू, गुरुजींच्या विविध तऱ्हा, संपादक पद, स्वप्नं, फाशी, मंदिर, स्मशान, वेड अर्थात ध्यास, देवपूजा, खानावळ, व्यायामाची तालीम, कुत्रं–मांजर, डॉक्टर, सामान्य माणसं, देशी हॉटेल, गाढव-माकड, लढाई, न्हावी इत्यादी विषयांवर मिरासदारांनी त्यांच्या खास खुमासदार शैलीत लेख लिहिले आहेत. अर्थातच ते विनोदी अंगाने लिहिलेले आहेत. त्यांचे उपहासात्मक विनोद वाचकाला खळखळून हसवतात. हे लेख रंगतदार किस्से आणि आठवणींमुळे रंजक झाले आहेत. एकदा वाचायला घेतल्यावर हे पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही. तेव्हा हे वाचनीय विनोदी पुस्तक अवश्य वाचलं पाहिजे आणि त्यातील किश्श्यांमधून निर्माण होणाऱ्या विनोदाचा आस्वाद घेतला पाहिजे.
-
Sudoul Raha (सुडौल राहा)
आहाराच्या सवयींबाबत तारतम्य बाळगणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यात सामान्य माणसाला आहार घटकांची पुरेशी माहिती नसते. हे सामान्य ज्ञान सोप्या , सहज भाषेतून या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोचतं. प्रथिने, कर्बोदकं आणि इतर आहार घटक, ते उपलब्ध असणारे पदार्थ आणि त्यांचा दैनंदिन आहारातील समावेश , या सर्व गोष्टींची शास्त्रोक्त माहिती या पुस्तकातून समोर येते. पुजा मखिजा यांची सांगण्याची रीत या पुस्तकाची जमेची बाजू. माणसाच्या आहाराच्या सवयींविषयी बोलताना त्या अनेक गमंतीशीर संदर्भ देतात. या आहाराच्या सवयींना त्या माकडाची उपमा देतात. त्या म्हणतात, माकडासारखा आहार- म्हणजे एक खूळ संपलं की दुसरं खूळ डोक्यात घेणारा आहार. अकाई बेरीजपासून अॅगयपल सायडर व्हिनिगरकडे धाव घेणारा आहार. कोणतीही नवी, चकचकीत, आकर्षक गोष्ट पाहिली की, माकड त्यावर झडप घालतं, त्यातला काही भाग टाकून देतं आणि फक्त आवडीचा तेवढाच खातं, तसा हा आहार असतो. `मंकी डाएट` तुम्हाला `नव्या` अन्नपदार्थाबद्दल अर्धी कच्ची माहिती देतं आणि त्याचे फायदे अवास्तव वाढवून सांगतं. अशा डाएटमध्ये एकाच अन्नघटकाचा अतिरेक असतो.