-
Ya Shetane Lala Lavila (या शेताने लळा लाविला)
शेती म्हणजे भुई रुजवण्याची किमया.जगाचं उदरभरण करण्यासाठी माणसाला मिळालेलं वरदान! भूईची सेवा करणाऱ्या शेतकरी बळीवंतना मी ईश्वर मानतो. पण तोच शेतकरी आज मरणप्राय झाला आहे. आत्महत्येची काळोखी वाट चालू लागला आहे. मीही औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळसखेड या माझ्या गावी गेली पन्नास वर्ष शेती करतोय. इथली जमीन म्हणजे बरड टेकड्या. जवळ नदी-नाला नाही. केवळ कोरडवाहू शेती. त्यात सततचे दुष्काळ,अतिवृष्टी,गारपीट,सरकारी अनास्था. पण अस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटांना तोंड देत मी शेतीत टिकून राहिलो. कितीदा उध्वस्त झालो,पण दर वेळी जिद्दीने उभा राहिलो. नवं तंत्र,नवी पीकपद्धत वापरली. पाणी साठवणीचे नाना प्रयोग केले. आणि शेती बहरत गेली. विकासाची हि गंगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावी,यासाठी सरकारच्या पाठीशी लागून प्रयत्न करत राहिलो. मला या अनुभवातून कळलेलं शेती-पाण्याचं ज्ञान समाजाला द्यावं,या हेतूने सांगितलेली,हि माझी शेतीशी संबंधित आत्मकथा.
-
Ranmitra (रानमित्र)
माणूस आणि प्राणी यांच्यातील अनोख्या नात्याची आगळीवेगळी गोष्ट सांगणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे हे देखणे पुस्तक आहे. हेमलकशाच्या दुर्गम जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात एक वेगळंच जगणं घडलं. त्या जगण[...]
-
Reportingche Divas (रिपोर्टिंगचे दिवस)
अनिल अवचट गेली चाळीसाहुन अधिक वर्ष विविध सामाजिक प्रश्नांवर लिहित आहेत. आज लेखक म्हणून प्रसिद्द असलेले अवचट मुलात पिंडाने पत्रकार. त्या भुमिकेतुनच ते पंतप्रधान इंदिरा गाँधीपासून चलावालितल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसनारं जग त्यातल्या कंगोर्यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही. अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ़ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामजिक अंत प्रवाहांना आवाज देणारा हां दस्तावेज.
-
Jag Badal Ghaluni Ghaav ( जग बदल घालुनि घाव)
जातीय दुःखावर उत्तरे शोधता शोधता स्वतःसोबत हजारो दलितांच्या जीवनात सन्मानाची ज्योत पेटवणा-या एकनाथ आवाड यांचे दलित साहित्याच्या प्रवाहात एक पाऊल पुढे टाकणारे आत्मकथन. जगण्याच्या लढाईत आलेल्या यशापयशाची व्यक्तिगत पातळीवरची नोंद यातून या पुस्तकाची वीण तयार होते, तर या लढाईला जातिअंताच्या लढाईचं परिमाण लाभल्यामुळे एका सार्वजनिक चळवळीचा इतिहास त्यातून प्रतिबिंबित होतो. जातिअंताच्या लढाईत समाज किती पुढे सरकला, या प्रश्नाचं उत्तर काहीसं निराशाजनक आहे, तरी पण हे स्वकथन कार्यकर्त्यांना निराश करत नाही. कारण मुळात ज्याच्याविरुद्ध आपण लढाई सुरू केली तो शत्रू किती बलवान आहे हे समजून-उमजून ही लढाई केल्यामुळे इथला पराभवसुद्धा चळवळीतल्या कार्यकर्त्यांला एक वेगळा उत्साह देणारा आहे, याचाच प्रत्यय येत राहतो. या लढाईत स्वजातीच्याच एका माणसाने आवाडांवर प्राणघातक हल्ला करावा आणि एका परजातीच्या प्रौढेने हात जोडून आवाडांची विचारपूस करावी, यातील अंतर्विरोध जातिअंताच्या लढाईतल्या कार्यकर्त्यांना वेगळं बळ देणारा आहे.
-
Sambhav-Asambhav (संभाव असंभव)
माणसाच्या आकलनापलीकडे काही अदृश्य, पारलौकिक, अधिभौतिक स्वरूपाच्या शक्ती आहेत, अशी समजूत माणूस बाळगून आहे. देव या संकल्पनेवरची श्रद्धा ही त्यातली सर्वांत आदिम. पण देवाप्रमाणेच माणसाचा आत्मा, साक्षात्काराचे अनुभव, समाधिवस्था, आतला आवाज, मृत्युसमीप व मृत्युपश्चात अनुभव यांवरही लोक विश्वास बाळगून असतात. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली कित्येक वर्षं रीतसर अभ्यास करत आहेत. विज्ञानाच्या कसोटीवर माणसाच्या समजुती तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा आणि त्यातून निघणा-या निष्कर्षांचा धांडोळा.
-
Maza Priscription ( माझं प्रिस्क्रिप्शन )
सध्याची आधुनिक आरोग्यव्यवस्था आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. मोठमोठी हॉस्पिटल्स, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि परदेशी औषधं यामुळे वैद्यकीय उपचार भलतेच महागडे होऊन बसले आहेत. ते घेताना पेशंटचे खिसे हमखास रिकामे होतात. परंतु त्याला उत्तम आरोग्यसेवा मिळेल याची खात्री मात्र नसते. पण तरीही आरोग्यसेवेतल्या या दोषांवर मात करणं शक्य आहे. रूग्ण हा केंद्रस्थानी मानून डॉक्टरने स्वतःतलं सर्व कौशल्य पणाला लावलं तर स्वस्त आणि यशस्वी रूग्णसेवा देता येऊ शकते, असं म्हणत आहेत हे नामांकित आणि प्रयोगशील सर्जन.