-
Morning Walk (मॉर्निंग वॉक)
पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे टवटवीत लेखन घेऊन लेखक-संवादकार-नाट्य-चित्र कलावंत व त्याहीपेक्षा एक जीवनासक्त कलारसिक असलेले पांडुरंग कुलकर्णी 'मॉर्निंग वॉक'चे बोट धरून आपल्या भेटीस येत आहेत. सुचेल तसं व स्फुरेल त्या चिंतनाचा हा सामाजिक,वैचारिक असा गुच्छ 'मॉर्निंग वॉक' वाचताना 'वाचत वाचत' ठेवण्यात यशस्वी होतो. कारण वाचकांच्या अगदी जवळचेच विचार व घटना यांचा हा रम्य कॉलीडोस्कोप आहे. लेखकाचे अनुभव वाचकाचेच अनुभव आहेत, हे विशेष. एका सुप्रसन्न - स्वच्छ - चिंतनशील लेखनाबद्दल श्री. पांडुरंग कुलकर्णी यांचे हार्दिक अभिनंदन!
-
Dukh He Majhe Mala (दु:ख हे माझे मला )
जीवनात दु:ख, वेदना , केल्श , यातना ,भोग , त्रास , कष्ट , दर्द , शल्य , सल , मनस्ताप , खेद ,खंत , बोध , टोचणी , विप्रिय , कृच्छ्र , पीडा आहेतच ………… म्हणूनच ……. सुख द्यावे आणि सुख घ्यावे.
-
Guru Majha Samarth (गुरु माझा समर्थ )
आयुष्यात गुरूशिवाय काही करता येत नाही. केवळ आध्यात्मिक क्षेत्रातच गुरू लागतो असे नाही; प्रत्येक क्षेत्रात गुरूचे स्थान मोठे आहे. गुरूबद्दलच्या विविध व्यक्तींच्या भावना व्यक्त करणाऱ्या लेखांचा हा संग्रह आहे. गायत्री प्रकाशनाने यापूर्वी "आम्ही भावंडे' आणि "मैत्र जीवांचे' ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्याच मालेतील हे तिसरे पुस्तक आहे.