-
Eka Dollerchi Goshta Ani Itar Katha (एका डॉलरची गो
लघुकथा हा साहित्यप्रकार अत्यंत प्रभावी आणि ताकदवान आहे. जशा तीन-साडेतीन मिनिटांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका लोकप्रिय होतात तशाच लघुकथाही वाचकप्रिय ठरतात. आणि हे जगभरातील शेकडो प्रसिद्ध लेखकांनी सिद्ध केलेले आहे. एक पानाची कथाही परिणामकारक ठरते, तर 'अलक' (अतिलघुकथा) अलीकडे बऱ्याच प्रमाणात रूढ झाली आहे. विषयांनाही मर्यादा नाही. प्रेम, गूढ / रहस्यमय, गुन्हेगारी, विनोद, सूड, कल्पनारम्य, बालवाचकांसाठी, भविष्यकालदर्शक अशी शेकडो कथानके असू शकतात. १७व्या शतकापासून जगभरात असंख्य लेखकांनी साहित्यविश्वात फार मोलाची भर टाकलेली आहे. ओ हेन्री, मोपासा, टॉलस्टॉय, एडगर अॅलन पो, सर ऑर्थर कॉनन डॉयल, वॉल्टेयर, जॉन आयटन, मॅक्झिम गॉर्की आदि दिग्गज लेखकांच्या, विषयांचे वैविध्य असलेल्या निवडक कथांचा अनुवाद म्हणजे “एका डॉलरची गोष्ट आणि इतर कथा"
-
First To Die (फर्स्ट टु डाय)
विक्रमी खपाचे उच्चांक निर्माण करणारा सध्याच्या काळातील लोकप्रिय लेखक जेम्स पॅटरसन यांची एक खळबळजनक रहस्यकथा. वैयक्तिक गंभीर समस्या, सामाजिक सुरक्षेची जबाबदारी आणि नव्यानं फुलणारं प्रेम या तिहेरी पेचात अडकलेल्या लिंडसे बॉक्सर या महिला पोलिस इन्स्पेक्टरची रोमांचक कहाणी. नवपरिणीत जोडप्यांची हत्या करणारा विकृत खुनी आणि त्याला कोर्टासमोर खेचून कडक शासन देण्यासाठी कटिबद्ध झालेला 'वुमेन्स मर्डर क्लब'. भावी सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं रंगवत हनिमून साजरा करणार्या तरुण वधुवरांचे मृतदेह लाजिरवाण्या अवस्थेत उघडकीस येतात. योजनाबद्ध खून करणारा लिंगपिसाट गुन्हेगार एकेक पुरावा मागे ठेवत पोलिसखात्याची मती गुंग करुन सोडतो आणि या रहस्याची उकल करण्यासाठी, स्वत:च्या अडचणीवर मात करुन, लिंडसे बॉक्सर आकाशपाताळ एक करते. तिच्या या धडपडीला उत्तम साथ देतात, अन्य तीन महिला - एक बातमीदार, एक सरकारी वकील आणि एक शवचिकित्सक डॉक्टर - रहस्याच्या या भोवर्यात वाचकही वेगानं फिरत राहतो...
-
Coma
बोस्टनमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांच्या मामुली शस्त्रक्रियांपासून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. आठ क्रमांकाच्या खोलीत एकदा गेलेले रुग्ण पुन्हा शुद्धीवर येतच नव्हते. या कोमा केसेसच्या छडा लावण्यासाठी मेडिकलच्या एका विद्यार्थिनीने त्यासाठी जिवाची कशी बाजी लावली आणि तसे करून तिच्या हाती काय जीवघेणे लागले त्याचीच ही वाचता वाचता अंगावर शहारे आणणारी कादंबरी. तसे हे काल्पनिक आहे आणि वाचणार्यालाही कदाचित असे घडते का असे वाटू शकेल पण गेल्या काही वर्षात परदेशातच नव्हे तर आपल्याही देशात हे काहीच नाही अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत त्यामुळे लेखकाने खूप आधीच ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केल्याची कमाल वाटते. मराठीतही हा अनुवाद येऊन पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. आत्ताआत्ता प्रसिद्ध झाली आहे ती त्याची पाचवी आवृत्ती.
-
The Pelican Brief
वॉशिंग्टनमध्ये, एका अंधार्या पोर्नो चित्रपटगृहात एका प्रेक्षकाचा गळा घोटून रहस्यमय खून होतो. सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायाधीश जगातून नाहीसे होतात. आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने डार्वी शॉ या घटनांच्या खोलाशी जाऊन, गुन्ह्यांची संभाव्य उकल आपल्या संशोधनपर निबंधात करते. तिच्या दृष्टीने तो अंधारात मारलेला एक वकिली तीरच- परंतु वॉशिंग्टनच्या राज्यव्यस्थेत त्यामुळे सुरुंग लागण्याचा धोका निर्माण होतो. अनपेक्षितपणे ती एका हत्त्येची साक्षीदार होते. एका निर्भय पत्रकाराच्या मदतीने ती त्या भीषण रहस्याचा शोध घेतो- सत्य जगापुढे आणण्याचा जो जीवघेणा खेळ खेळते त्याबद्दलचे तितकेच जीवघेणे लेखन म्हणजेच ही कादंबरी. ती लिहिणारे जॉन ग्रिशॅम आपली वकिली सोडूनच पूर्ण वेळ लेखनाकडे वळलेली आहेत आणि त्यांच्या पहिल्या चार पुस्तकांची विक्रीच तीन कोटी प्रतींच्यावर गेलेली आहे- ह्यातच ह्या लेखनाच्या सकसतेचे रहस्य दडलेले आहे.