-
Pratiksha Shivachi (प्रतीक्षा शिवाची)
● (प्रतीक्षा शिवाची) हे काशीच्या या महाकाव्यावर अधिकारवाणीने भाष्य करणारे, वस्तुनिष्ठ, तथ्यांचा परामर्श घेणारे आणि तरीही भावनेने ओतप्रोत भरलेले दाहक पुस्तक आहे. डॉ. आनंद रंगनाथन, लेखक आणि शास्त्रज्ञ ● ज्ञानवापीची कित्येक काळ दडपून ठेवलेली गुपिते अगदी निगुतीने प्रकाशझोतात आणली गेली असल्याने हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. अॅड. श्री हरि शंकर जैन ● इथला बारीक सारीक तपशीलही पुराव्यानिशी मांडला आहे. या विषयाशी संबंधित सर्व कागदपत्रांचे नीट संपादन केल्यामुळे या विषयाला पूर्ण न्याय मांडला आहे. ॲड.ए.एस. श्री विष्णु शंकर जैन ● सर्वसामान्य वाचकापासून आजवर झाकून ठेवलेली सगळी तथ्ये डॉ. संपत अतिशय उत्कंठावर्धक, सहज आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता, तरीही नेटकेपणाने आणि स्पष्टपणे प्रकाशात आणतात. डॉ. H.R. मीरा, संशोधिका आणि लेखिका ● भारतातील धर्म निरपेक्षतावाद आणि सांप्रदायिक सलोखा याचे आधुनिक युगाच्या संदर्भाने असणा महत्त्व आणि काशी विश्वनाथ मंदिराची सखोल रुजलेली संस्कृती आणि अध्यात्मिक वारसा समजून घेणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.
-
Divine Agitators : Tilak & Hardie
Take a trip back in time to meet historical figures like James Keir Hardie and Bal Gangadhar Tilak, who challenged the establishment and wrought radical changes. Author Umakant Tasgaonkar brings to life the thrill of the fight for political freedom as Hardie fought for social and racial equality and Tilak fought for self-rule. But these radical ideas came with a heavy price! Discover the roots of political conflict and the evolution of ideas that have shaped the world we live in today.
-
Te Don Kshansuddha (ते दोन क्षणसुद्धा...!)
आपल्या हातात फार वेळ नाही उरलेला हे माहिती असताना उरल्यासुरल्या दिवसांना आनंदाचं तोरण लावण्यासाठी धडपडणारी एक तरुण मुलगी .. पोटच्या पोरीचा हा विलक्षण हतबलपणे पाहत तिच्यामागे पहाडासारखी उभी राहिलेली आई .. आणि दोघींमधला एक करुण लपंडाव . मृत्यू काही पावलांवर आहे .. आहेच ...हे दोघींनाही माहिती ! पण ना हिने तिला सांगितलेलं, ना तिने हिला ! मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोनच दिवसांनी आईला एक खाजगी डायरी सापडते ... तिच्या मुलीची ! शरीरात शिरलेल्या चिवट व्याधीचा डंख क्षणाक्षणाने कुरतडत असताना लिहिलेली... मृत्यूच्या मिठीत खेचत नेणाऱ्या प्रत्येक दिवसातला क्षण -न-क्षण जिवंत उभा करणारी डायरी ! हवंहवंसं आयुष्य कणाकणाने हातातून निसटतंय याची खोल जाणीव असलेल्या या खळबळत्या वादळात काय नाही ? छोट्या लढायांमधल्या विजयाचा अहानंद , मोठया युद्धातल्या पराभवाचे डंख , जखमा बांधत नेणारा नर्म विनोद आणि हातून सगळं सुटताना गवसलेलं तत्वज्ञानही ! .... हे सगळं लिहिणारी गौरी आज असती ,तर तीस वर्षाची असती . तिचा डाव अर्ध्यावर मोडला हे खरं ; पण ती जे जगली, त्यातला कणही तिच्याहून दुप्पट आयुष्य मिळालेल्यांचा वाट्याला येत नाही अनेकदा !! आज वाटतं, तेव्हाच का नाही मी थोडं जास्त बोलले तिच्याशी ? तेव्हाच का नाही तिच्या समृद्ध मनाच्या विहिरीत थोडी आत उतरून तिला आणखी घट्ट भेटले का नाही ? .....का ?
-
Hirvya Vata (हिरव्या वाटा)
निसर्ग, प्रवास, पर्यावरणाची जपणूक, परदेशातील जीवन, अनुभव यांचा मिलाफ म्हणजे डॉ. विनिता आपटे यांचे हे पुस्तक. उत्तर कोरिया, नॉर्वे, मालदीव, इंडोनेशिया, मलेशिया, श्रीलंका आदी देशांमधील त्यांच्या भेटीत आलेले वेगळे अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. स्कूबा डायव्हिंग, बीजिंगमधील दंड, व्हिएतनाममधील प्राणी, नॉर्वेतील पक्ष्यांचे आजोबा, नॉम - पेन मधील चिमणी पाखरं, चीनमधील ली नदी, जर्मनीतील त्या दोघी असे अनुभवविश्व छोटेखानी लेखांतून प्रगट होते. साधी - सुलभ ओघवती भाषा हे लेखनाची वैशिष्ट्य. पुस्तकाबरोबर एक सीडीही मोफत देण्यात आली आहे.