-
Shivnetra Bahirji Khand 4 (शिवनेत्र बहिर्जी खंड ४)
शिवनेत्र बहिर्जी नाईक खंड ४ आदिलशाही क्रूर सरदार अजीजखान हा स्वराज्याच्या सीमेत घुसण्याआधीच त्याला १० जून १६६४ ला कुडाळजवळ विषप्रयोग करून संपवण्यात आले. पण त्याच्यावर तो विषप्रयोग कोणी केला ? हजारोंच्या संख्येने सैन्यबल असलेल्या अजीजखानाच्या छावणीत घुसून त्याला मारण्याची आणि त्या छावणीतून सुखरूपपणे बाहेर पडण्याची ताकद फक्त मराठा गुप्तहेरांमध्येच होती. पण तो पराक्रमी गुप्तहेर कोण होता ? आणि त्याने आपली ती धाडसी कामगिरी कशी पार पाडली ? सुरतेच्या लुटीचा प्रतिशोध घेण्यासाठी मोघल बादशाहा औरंगजेबाने विजापूरच्या आदिलशाहावर दबाव आणला, त्याला बळी पडून आदिलशाहाने पुन्हा एकदा आपली शक्तिशाली फौज स्वराज्यावर पाठवली. त्या फौजेचे नेतृत्व करत होता प्रती अफजलखान म्हणून ओळख असलेला ‘खवासखान’. खवासखानाने शिवाजी राजांना संपवण्याची प्रतिज्ञा केली. तो इतक्यावरच थांबला नाही. त्याने आपल्या तलवारीवर शिवाजी राजांचे नाव कोरले. पण त्याचा तो प्रण फुसका ठरला. शिवाजी राजांनी आपल्या गुप्तहेर खात्याला सक्रीय करून त्याच्या मोठ्या फौजेला एकत्र येऊ दिले नाही. राजांनी सर्वप्रथम आपल्या पित्याचा शेवटचा शत्रू बाजी घोरपडेला संपवले आणि खवासखानाला विजापूरपर्यंत पळवत नेले. शिव इतिहासात आजवर फारसा प्रकाशझोतात न आलेला राजांचा हा अनोखा पराक्रम आणि बहिर्जी पथकाच्या शौर्यगाथेचा एक छुपा अध्याय. शेकडो वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या जुलमी विदेशी शासकांपासून मायभूमी स्वतंत्र करण्याचे पहिले कार्य केले छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजांनी दक्षिणेतील एक महत्वाचे बंदर ‘बसरुर हे पोर्तुगीजांपासून मुक्त केले. बसरूर जवळील एका बेटावर पोर्तुगीजांनी त्यांचे ‘बर्सिलोर’ हे ठाणे उभारले होते. गोव्या पोर्तुगीजांना गाफील ठेऊन राजे बर्सिलोरला पोहोचले आणि तिथल्या साडेतीन हाजार पोर्तुगीज सैनिकांना एकाच दिवसात पूर्णपणे संपवून राजांनी पोर्तुगीज वखारी लुटून साफ केल्या. सुरतेच्या लुटीनंतरची ही सगळ्यात मोठी मोहीम होती. ह्या मोहिमेचे वेगळे महत्व होते. ते म्हणजे ह्या वेळी शिवरायांनी केलेले दोन प्रमुख अविष्कार ‘बहिर्जी गुप्तहेर पथक’ आणि ‘मराठा आरमार’ ह्यांचा ह्या मोहिमेत एकत्रितपणे सहभाग होता. आदिलशहा राजांचा बिमोड करू शकत नाही हे पाहून औरंगजेबाने आपला मुत्सद्दी सेनानी मिर्झा राजा जयसिंगाला दक्षिणेत पाठवले. त्याने राजकारणाचा डाव आखून राजांना कात्रीत पकडले आणि राजांना आग्र्यात आपल्या पुत्राला सोबत घेऊन जावे लागले. पण राजांना बादशाहावर विश्वास नव्हता. त्यांनी आपले छुपे अस्त्र ‘बहिर्जी पथक’ सक्रीय केले आणि बादशाहाला त्याच्याच दरबारात संपवण्याची योजना आखली पण मुत्सद्दी औरंगजेबाने ती योजना सफल होऊ दिली नाही आणि राजांना कैद केले. विषारी सापाच्या विळख्यातून ही बाहेर पडावे तसे महाराज औरंगजेबाच्या त्या कैदेतून बाहेर पडले. पण ते इतके सोपे नव्हते. बहिर्जी नाईकांनी आखलेली ती एक थरारक योजना होती. एक विलक्षण गूढ गाथा. बहिर्जी नाईकांनी ती योजना कशी आखली ? आणि त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ? शेवटी ती योजना कशी सफल ठरली ?
-
Setu (सेतू)
प्रेमाचा 'सेतू'आता सर्वत्र उपलब्ध प्रेमाला नसतो भाषेचा बांध. प्रेमाला नसतं प्रांताचं बंधन. प्रेम मुक्त असतं, बेधूंद, स्वच्छंदी वाऱ्यासारखं पण, प्रत्येकाच्याच नशीबात नसतो आनंदाचा सहजसोपा रसाळ गोडवा. संघर्षाचा सेतू तुडवतच त्यांना पोहचावे लागते प्रेमाच्या तीरावर. हजारो किलोमीटर दूरवरून एक तरूण नाशिकमध्ये येतो काय आणि इथल्या एका गोड मुलीच्या प्रेमात पडतो काय... पण पुढे काय? एवढं सोपं असतं का प्रेम निभावणं? - प्रभू रामचंद्राचा अभ्यास करण्यासाठी आलेला केविन आणि नृत्याची साधना करणारी राधा यांच्या नात्याची प्रेमवेल्हाळ गोष्ट म्हणजेच 'सेतू'. - दुरावलेल्या मायेच्या नात्यांना नव्याने प्रेमाचं लिंपण करणारी गोष्ट म्हणजेच 'सेतू' - प्रत्येकाच्या मनातला हळुवार कोपरा म्हणजे सेतू - तुमच्या आणि माझ्या मनाला जोडणारी भावना म्हणजेच सेतू.
-
Shivnetra Bahirji Khand 3 (शिवनेत्र बहिर्जी खंड ३)
सह्याद्रीला अभिमान होता त्या पराक्रमी राजाचा, आणि त्या राजाला अभिमान होता त्याच्या शूर योद्ध्यांचा. ज्यांना ना इतिहासात जागा असणार होती ना त्यांच्या शौर्याचे कुठे कौतुक होणार होते, प्रत्येक क्षण ते स्वराज्यासाठी जगले, आपल्या परिवाराचा त्याग करून त्यांनी स्वराज्यालाच आपला परिवार मानले. ते महाबलशाली होते , ते महाचाणक्ष होते, शत्रूच्या गोटात राहून ते स्वराज्यासाठी लढले, त्यांच्या श्वासात आणि ध्यासात फक्त स्वराज्य होते. जसे ते आपले कर्तव्य गुप्तपणे बजावत राहिले तसेच स्वराज्याच्या इतिहासात देखील ते अदृश्यच राहिले. साडेतीनशे वर्षांनंतर आज ते वीर प्रकाश झोतात येत आहेत. त्या नायकांच्या, त्या योद्ध्यांच्या, त्या गुप्तहेरांच्या पराक्रमाची गाथा म्हणजे लेखक प्रेम धांडे लिखित "शिवनेत्र बहिर्जी" ही कादंबरी.* गेल्या तीन वर्षांपासून बेस्टसेलर चा 'किताब बाळगून असलेली ही कादंबरी प्रत्येक शिवप्रेमीला शिवकाळाची सैर घडवून आणते. शिवनेत्र बहिर्जी खंड 3
-
Shivnetra Bahirji Khand 2(शिवनेत्र बहिर्जी खंड २)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यातील एक प्रमुख अस्त्र कोणते...? अगदी स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते त्यांच्या शेवटच्या संग्रामापर्यंत शिवरायांनी ते अनोखे अस्र आपल्या जवळ बाळगले आणि त्यामुळे त्यांना अलौकिक असे यश मिळत गेले. त्या अस्राच्या जोरावर राजांनी बलाढ्य आदिलशाहीला मुठीत आवळून ठेवले. त्या अस्त्राच्याच जोरावर कपटी मोघल बादशाहा औरंजेबाला देखील त्यांनी आपल्या टाचेखाली ठेवले. ते अनोखे अस्र म्हणजे राजांचे गुप्तहेर खाते आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’! शिवरायांच्या या गुप्तहेरखात्याच्या कार्याचा वेध घेणारी एक महा कादंबरी शृंखला आता उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात बेस्ट सेलर ठरलेली ही कादंबरी मालिका आपल्याला शिवकाळाची सैर घडवून आणते. सारे प्रसंग आपल्या डोळ्यांपुढेच घडताना दिसतात त्यामुळे आपण स्वतः बहिर्जी नाईकांची ती गूढ गाथा आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. .
-
Shivnetra bahirji khad 1 (शिवनेत्र बहिर्जी)खंड १
प्रेम धांडे लिखित शिवनेत्र बहिर्जी मालिकेतील हे पहिले पुस्तक होय. बहिर्जी नाईकांबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. परंतु उपलब्ध माहितीचा अभ्यास करत कल्पनाविस्तार करून ही कथा खूप उत्कृष्ठरित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. रानात शिकार करणारे दौलतराव हेरखाते प्रमुख आणि शिवरायांचे तृतीय नेत्र बहिर्जी नाईक कसे बनतात आणि हेरांचे विस्तृत जाळे कुतुबशाही, आदिलशाही आणि मोघलाईत कसे विणतात हा प्रवास खूपच आवेशपूर्ण आणि मनोरंजक आहे. शिवरायांचे हेरखाते समकालीन सत्ताधीशांच्या तुलनेत खूपच अग्रीम होते हे आपल्याला कळून येते.चार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – • शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. • बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली. • स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. • स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. • जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट.