Shivnetra bahirji khad 1 (शिवनेत्र बहिर्जी)खंड १
प्रेम धांडे लिखित शिवनेत्र बहिर्जी मालिकेतील हे पहिले पुस्तक होय. बहिर्जी नाईकांबद्दल खूप कमी माहिती उपलब्ध आहे. परंतु उपलब्ध माहितीचा अभ्यास करत कल्पनाविस्तार करून ही कथा खूप उत्कृष्ठरित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. रानात शिकार करणारे दौलतराव हेरखाते प्रमुख आणि शिवरायांचे तृतीय नेत्र बहिर्जी नाईक कसे बनतात आणि हेरांचे विस्तृत जाळे कुतुबशाही, आदिलशाही आणि मोघलाईत कसे विणतात हा प्रवास खूपच आवेशपूर्ण आणि मनोरंजक आहे. शिवरायांचे हेरखाते समकालीन सत्ताधीशांच्या तुलनेत खूपच अग्रीम होते हे आपल्याला कळून येते.चार खंडांच्या या कादंबरी मालिकेतल्या पहिल्या पुस्तकात वाचायला मिळते – • शिवरायांची आणि बहिर्जी नाईकांची पहिली भेट. • बहिर्जी नाईकांचे प्रारंभिक जीवन आणि त्यांनी गुप्तहेर खात्याची सांगड कशी घातली. • स्वराज्याच्या महिला गुप्तहेरांची शौर्यगाथा. • स्वराज्यावरचे पहिले आक्रमण फतेहखानाच्या लढाईत बहिर्जी नाईकांचे योगदान. • जुन्नर आणि श्रीगोंद्याची लुट.