-
Golmaal (गोलमाल)
‘‘हे पहा, बाहेर टळटळीत दुपार आहे. उजेड नुसता पावसानं कोसळणाऱ्या दरडीसारखा अंगावर कोसळतोय. तरीही तो बाहेरच ठेवून इथं मिट्ट काळोख केल्याशिवाय तुम्हाला काही दिसत नाहीय. मघाशी तुम्हाला दिलेली कॉफी जीभच काय पण हातही भाजेल इतकी कडकडीत होती. त्यात पाक होण्याइतपत साखर घातली होती; पण ती तुम्हाला प्रेतासारखी थंडगार आणि खारट लागली. उलट तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या कपात बर्फाचा खडा आणि चमचाभर मीठ घालताच ती तुम्हाला व्यवस्थित वाटली. आज उन्हाळ्याचा कडाका आहे. रेकॉर्ड ब्रेक करणारं टेम्परेचर आहे. आणि तुम्ही अर्धा डझन ब्लँकेट्स अंगावर घेऊनही थंडीनं कुडकुडताय. मी तुमच्या गालावर सॅन्डपेपर फिरवला तेव्हा तुम्हाला कोणीतरी मोरपीस फिरवल्यासारखं हुळहुळलं. उलट कापसाच्या बोळ्यांत कोणी टाचण्या का ठेवल्यात म्हणून तुम्ही बोंब ठोकलीत. निरनिराळे रंग मी तुम्हाला दाखवले तेव्हा जांभळ्याच्या ठिकाणी तुम्हाला पिवळा दिसला, तांबड्याच्या जागी हिरवा आणि नारिंगीच्या ऐवजी निळा. आता समजलं, तुम्हाला काय झालंय ते?’’
-
Bhintina Jibhahi Astat (भिंतींना जिभाही असतात)
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह
-
Osamachi Akher Aani Jeevanala Bhidlela Vidnyan (ओस
साहित्य,कला आणि विज्ञान, माणसाचं माणूसपण सिध्द करणाऱ्या त्याच्या प्रतिभेचे तीन रम्य आविष्कार .तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमधले . तरीही सर्जनशील नवनिर्मितीचा धागा त्यांना एकत्र गुंफून टाकणारा आहे . असं अजूनही सहसा या तीन क्षेत्रांमध्ये फारसं सख्य , सौहार्द असल्याचं दिसून येत नाही . नवनिर्मितीच्या विविध आविष्कारांमध्ये कृत्रिमरीत्या तयार केलेली हि दरी कायम राहण माणसाच्या सांस्कृतिक विकासाच्या आडच येणारी आहे , पण हि दरी पार करण्याचा चंगच आता वौज्ञानिकांनी बांधलेला आहे . साहित्य, कला ,दैनंदिन जीवन यांच्या अनेक पैलूंचा विज्ञानाच्या नजरेतून वेध घेतला जात आहे . त्यांचाच परिचय ललितगद्यचा धाटणीतून करून देणारा हा लेखसंग्रह .
-
Off Line (ऑफ लाईन)
विज्ञानकथा हा प्रकार मराठीत रुजवणा-या निवडक लेखकांपैकी एक म्हणजे डॉ. बाळ फोंडके. ‘ऑफ लाइन’ या नव्या कथासंग्रहातही अशाच विज्ञानकथा जरी असल्या तरीही या कथांना पूर्णपणे विज्ञानकथा म्हणता येणार नाही. कारण या कथा म्हणजे तंत्रज्ञानाच्या आवाक्याने झपाटून गेलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा घेतलेला वेध म्हणावा लागेल. कारण वैज्ञानिक शोधामुळे मानवी आयुष्य अतिशय गतिमान झालं असलं तरी आयुष्याला मिळालेल्या या गतीमधून कुठेतरी आपलं माणूसपण हरवत चाललं आहे. याचीच जाणीव या कथा वाचताना वेळोवेळी होत राहते.
-
Sugraniche Vidnyan (सुगरणीचं विज्ञान)
माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ङहन्टर गवररछ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण नेमकं किती असावं याचं व्यवधान राखावं लागतं. ही सगळी अवधानं पार पाडताना आपण एक वौज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो याची जाणीव सुगरणींना असतेच असं नाही. त्या प्रक्रियेपाठी विज्ञानाची जी संकल्पना अनुस्यूत आहे असं मी मानलं ते कितपत बरोबर आहे? आणि सवा|त महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल? की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही? अशा प्रश्नांची उकल करणारे हे पुस्तक.