-
Tya Tithe Rakhatali (त्या तिथें रुखातळीं)
लेखक गोपाळ नीळकंठ दांडेकर यांनी त्यांच्या वाघरू आणि त्या दशमांश रुखताली या दोन कादंबऱ्या एकत्र करून ‘एक वाघरू त्या तिथे रुखातळीं’ या पुस्तकात साकारल्या आहेत. वाघरूमध्ये, लेखकाने राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका परिसराचे प्रेम वर्णन केले आहे - बाबुडा टायगर क्लबकडे. दुसरीकडे, भिवगडच्या पायथ्याशी असलेल्या ३०० वर्ष जुन्या आंब्याच्या झाडाखाली घडलेल्या काही वास्तविक घटनांचे वर्णन त्या तिथी रुखातळींमध्ये केले आहे. त्यामुळे या दोन गो.नी.दांडेकरांच्या छोट्या कादंबऱ्या म्हणून वर्गीकृत करता येतील.
-
Maharashtra Darshan (महाराष्ट्र दर्शन)
अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युध्दश्री ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसत नाही. हा गुण डोंगरावरून वाहात येणार्या भराट वार्याचा आहे. कृष्णा, कोयना,पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तिभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला, त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आतिथ्यशील आहे. किंबहुना तो आहे गिरिशिखरांच्या दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवन पेटवील. संतुष्ट झाला तर कारूण्याची गंगा वाहवील. त्या महाराष्ट्राचे हे दर्शन
-
Durgabhramangatha (दुर्गभ्रमणगाथा)
एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही. दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला. पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.
-
Jait Re Jait (जैत रे जैत)
कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा मी पाहिला आणि थक्कित होऊन उभा राहिलो. अवघा सह्याद्रि मंडळात कडा नाही. मग दिसली ता कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी-आग्यामाश्यांची. त्या पोळ्यांचा
-
Smarangatha (स्मरणगाथा)
सर्वांना परिचित असलेल्या लेखकाच्या अत्यंत रसाळ अशा शैलीत सांगितलेली आणि शेकडो नाट्यपूर्ण प्रसंगांनी नटलेली ही `स्मरणगाथा’ ही वाचीत असताना पानापानांतून आपल्याला असे जाणवते, की बालवयापासूनच प्रचंड जिद्द उरात घेऊन या माणसाने जीवनाच्या धकाधकीत उडी घेतली. कडूगोड, भीषण भयानक, क्वचित जीवघेण्या अनुभवांच्या आगीत त्याच्या श्रद्धा तावूनसुलाखून निघाल्या. त्याच्यातला माणूस स्वातंत्र्यपूर्व भारतात इंचाइंचाने वाढतच गेला आणि त्यामुळे गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर हा कधी कलंदर वाटला, कधी अवलिया वाटला, तरी मूलतः ज्याने स्वतःविषयी खूप काही सांगावे आणि ज्याच्याविषयी तुम्ही-आम्ही खूप काही ऐकावे, असा निखळ, हाडामासाचा, छाती आणि काळीज दोन्ही असलेला, असा माणूस राहिला. `स्मरणगाथे’च्या सहाशे पानांतून या माणसाचे संपन्न व्यक्तिमत्त्व संपूर्णपणे फुलून आलेले आहे. दांडेकरांच्या आजवरच्या विपुल आणि गुणसंपन्न साहित्यात, त्याचप्रमाणे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयातही, `स्मरणगाथा’ हा एक संस्मरणीय मैलाचा दगड आहे.
-
Das Dongari Rahato ( दास डोंगरी राहातों )
या लोकोत्तर महानुभावानं जन्मभर समाजचिंतन केलं रात्रंदिवस एकच ध्यास ``निशिदिनिं जनचिन्ता लागलीसे उदारा’’ अश्या जगा आगळ्या छंदानं वेढलेल्या विरक्त- पण देशाच्या संसाराची चिंता वाहणार्या श्रीसमर्थ रामदासांचं लीळाचरित्र सांगणारी रसमयी कादंबरी ``दास डोंगरीं राहातो’’
-
Chhanda Majha Vegala (छंद माझे वेगळे )
जन्मभर नाना छन्दांमागं धांवत राहिलों. पायांखालीं काय तेंही पाहिलं नाहीं. आतां शेवटपर्यंत हे छन्द सुटतीलसं वाटत नाहीं. एक मात्र झालं. आयुष्य बहुशः कधींच उबगवाणं वाटल नाहीं. हा छन्द, तो छन्द, असं स्वतःचं कौतुक पुरवीत राहिलों. त्या छंदांसवें वाटचाल करीत असतांनाचे हे कांहीं मोहरलेले क्षण!
-
Mogara Phulala (मोगरा फुलला)
ही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान-मुक्ताईची आणि प्रात:स्मरणीय अशा त्यांच्या माता-पितरांची! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ-लौकीक अनुभविले, ते तर ‘शब्देंविण’ संवादिण्यासारखे! अशांची चरित्र-चित्रे रेखाटण्यास कलाकाराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिद्धी ‘अमृतातेंहि पैजा’ जिंकणारी असावी लागते. ‘भावार्थदीपिके’च्या सौम्य-शांत, प्रसन्न-मनोहर, जीवनोद्धारक प्रकाशात तीन तपांहून अधिक काळ न्हाऊन निघालेल्या गो. नी. दाण्डेकरांच्या कविमनाने अरूपाचे रूप ‘दावण्या’चा ध्यास घेतला. आजच्या कळाहीन जगात ‘ज्ञानेश्वरी’ जगू पाहणार्या एका विलक्षण जीवाची भावनोत्कट कहाणी त्यांनी या आधीच आपल्या ‘मृण्मयी’ या कादंबरीत सांगितली आहे. पण ‘वसुधैव कुटुंबकम्’ झालेल्या त्या मूळ कुटुंबाची कथा-गाथा गायिल्याविना त्यांचे कविमन कृतार्थ होऊ शकत नव्हते. आता ‘मोगरा फुलला’ आहे, फुले वेचिता कळियांसी बहर आला आहे; कल्पित पात्रांच्या मुखांतून अकल्पिताची कथा सांगण्याचे नवल वर्तले आहे. ह्या नवलगंधाने दाण्डेकर प्राणा-मनांतून फुलून आले आहेत, आणि मराठी कादंबरी-सृष्टीला एक नवलभेट देऊन कृतकृत्य झाले आहेत.
-
Tuka Akashaevadha (तुका आकाशाएवढा)
तुका झालासे कळस तुकारामबावांचे जीवन, म्हणजे मन आणि जनलोक या उभयतांसवें रात्रंदिवस चालणारा समरप्रसंग. त्यांची अभंगगाथा हा या समराचा त्यांनीं काढलेला आलेखच आहे. त्या अभंगांचे सूत्र कुठेंही सुटू न देतां, त्यांतील अन्त:प्रवाहांची नोंद घेत चितारलेलें बावांचे जीवनचित्र म्हणजे ‘तुका आकाशाएवढा’. त्यांचे नि:स्पृहपण, त्यांचा नि:संग स्वभाव, श्रीहरिदर्शनांचे त्यांचे आर्त, त्यांची उत्कटता, विठ्ठलप्रेमाच्या प्रवाहामध्ये त्यांचे स्वत:स झोकून देणें, त्यांची सामाजिक जाणीव हें सारेंच इथें चितारलें गेलें आहे.
-
Mrunmayi (मृण्मयी)
'मृण्मयी' मात्र केवळ शब्दकृत्य नव्हतं. तो एक आध्यात्मिक अनुभव होता. अशा तशा कुणाचा नव्हता, तो मीरेचा होता. मीरा जीवनाच्या उत्तरार्धात द्वारकेला जाऊन राहिली. राजाची राणी असल्यामुळं उणं कुण्या गोष्टीचं नव्हतं. तिच्या इथं जो येई. त्याला इच्छाभोजन मिळे. एके दिवशी एक तरणादेखणा जोगी येऊन उभा राहिला. त्यानं इच्छाभोजनाचं ऐकून मीरेला तिचं शरीर मागितलं. इवलं हसून नी म्हणाली, ‘‘बस? हेच मागितलंत? ते माझं उरलंच आहे कुठं? ते तर हरिनिर्माल्य आहे. हे माझं सखेसहोदर भवताली बसले आहेत. त्यांच्या समक्ष घ्या ते. विस्कटून टाका. इथंच अंथरुण मागवत्ये!’’ मनूनंही जोश्याला हेच म्हटलं- ‘‘-- हा तर आहे श्रीहरीच्या रूपावरून उतरलेला उतारा. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर. तेव्हा हे घ्या. विस्कटा. टाका फाडून-’’ ‘‘मात्र जे कराल, ते या माझ्यांच्या साक्षीनं होऊ द्या. या माडांच्या झावळ्या डोलत असोत. रातांब्याची पालवी हालत असो. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊ द्या.-’’ हे ज्याला कळलें, त्याला ‘मृण्मयी’ कळली. ती प्रयत्नपूर्वक समजून घ्यायचा विषय आहे. केवळ पानं उलटायचा ग्रंथ नव्हे.
-
Vadalatil Deepstambha (वादळांतील दीपस्तंभ)
जो भगवी वस्त्रें त्याला नाहीं, तरी पण जो जन्मभर संन्याशाचें जीवन जगला – समाजाच्या कल्याणासाठीं जो चंदनासारखा झिजत राहिला, अशा एका योद्धयाची ही जीवनगाथा— पू. सरसंघचालकांच्या शब्दांत सांगायचे, तर `संघनिर्मात्याविषयीं लिहिलेली ही कादंबरी हें मराठी ललित साहित्यामध्यें एक वैशिष्ट्यच म्हणावें लागेल.’