Maharashtra Darshan (महाराष्ट्र दर्शन)
अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या, काळसर मावळ्यांशी खेळावी लागली. ती युध्दश्री ती रग, तो आवेश, अजूनही मावळला नाही. कधी मावळेलसे दिसत नाही. हा गुण डोंगरावरून वाहात येणार्या भराट वार्याचा आहे. कृष्णा, कोयना,पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे. स्वाभिमानी तर आहेच आहे. कणखर आहे, चिवट आहे. मोडेल पण वाकणार नाही. मित्रांसाठी जीव देणारा आहे. भक्तिभावाने गहिवरणारा आहे. लढताना प्राण तळहाती घेणारा आहे. थोडासा भांडखोरही आहे. थोडीशी हिरवटपणाची झांक आहे. पण किती? चंद्रावरल्या डागाएव्हढी. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला, त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे. आतिथ्यशील आहे. किंबहुना तो आहे गिरिशिखरांच्या दैवतासारखा, शंभुमहादेवासारखा. संतापला तर त्रिभुवन पेटवील. संतुष्ट झाला तर कारूण्याची गंगा वाहवील. त्या महाराष्ट्राचे हे दर्शन