-
Arthshastracha Sankshipt Itihas (अर्थशास्त्राचा सं
हे छोटेसे पुस्तक आपल्याला खूप मोठी कहाणी सांगते. प्राचीन काळापासून ते आधुनिक जगापर्यंत अर्थशास्त्राच्या लघुतम इतिहासाचे हे पुस्तक म्हणजे युद्धांच्या मागे प्रच्छन्न आर्थिक शक्ती कशी काम करत असते, नवनवीन शोध कसे लागत असतात आणि सामाजिक बदल कसे होत असतात या गोष्टी मुळापासून उकरून काढते. भांडवलशाही आणि मार्केटच्या पद्धती यांचा उगम कसा होतो आणि अर्थशास्त्राच्या या विद्याशाखेला महत्त्वाच्या कल्पना प्रदान करणारे लोक कसा आकार देतात याचा मागोवा हे पुस्तक घेतं. कृषिक्रांतीपासून ते आपला ग्रह दिवसेंदिवस आणखी आणखीच कसा उष्ण होत जातोय, या गोष्टीपर्यंत अँड्य्रू ली हे आपल्याला अर्थशास्त्राविषयीची ही कहाणी सांगतात. या कहाणीत शतकानुशतकांपासून आणि वेगवेगळ्या खंडांचा विचार करत अर्थशास्त्र या विद्याशाखेमध्ये अंतर्भूत असलेली विविधता अधोरेखित होत राहते. मक्तेदारीच्या खेळाच्या मुळापर्यंत ते जातात आणि नांगराच्या शोधामुळे लैंगिक भेदाभेद कसे वाढले ते उलगडून दाखवतात. काही रोगांमुळे वसाहतवादाच्या काही प्रकारांना कसा आकार प्राप्त झाला तेही सांगतात. अमेरिकी शहरांमध्ये गगनचुंबी इमारती निर्माण होण्याची कारणे विशद करतात आणि बरेच काही सांगून जातात. या सगळ्या विचारमंथनाचा परिणाम म्हणजे आपल्या विवाला आकार देणारे असे अर्थशास्त्रीय कल्पनांवर आणि शक्तिस्त्रोतांवर प्रकाश टाकणारे हे रंजक पुस्तक.
-
Manasa Ashi Aani Tashihi (माणसं अशी आणि तशीही)
माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी.
-
Harit Yuddhe (हरित युद्धे)
एका पर्यावरण पत्रकार स्त्रीने केलेलं अनुभवकथन म्हणजे ‘ग्रीन वॉर्स.’ पर्यावरण रक्षणाच्या विविध मोहिमांदरम्यान आलेले हे अनुभव आहेत. त्या अनुभवांचं हे तपशीलवार चित्रण आहे. गारुड्यांचं पुनर्वसन, सारस पक्ष्यांना वाचविण्याची मोहीम, सुसरींच्या कमी होणाnया संख्येबाबत अभ्यास, मेघालयातील जंगलतोड थांबविण्यासाठी केलेले प्रयत्न, हुलॉक वानरांसाठी चालवलेलं मुक्तिकेंद्र, ‘सरस्वती वन्यजीव अभयारण्य’ वाचविण्यासाठी उघडलेली मोहीम, गोव्यात खाणमाफियांना दिलेली टक्कर, इंडोनेशियातील जंगल आणि ओरंग उटान माकडाचं अस्तित्व जपण्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न, हिमनद्या, ग्लोबल वॉर्मिंगसाठी अभ्यासदौरा इ. विविध प्रकारच्या पर्यावरण मोहिमा त्यांनी राबवल्या. तर पर्यावरणाच्या विविध अंगांचा बहार यांनी केलेला अभ्यास, पर्यावरणाच्या त्या त्या प्रश्नातील वंगोरे आणि आव्हानं, या समस्यांच्या संदर्भातील त्यांना भेटलेली माणसं इत्यादी बाबींबद्दल बहार यांनी वाचकांशी साधलेला हा.