Manasa Ashi Aani Tashihi (माणसं अशी आणि तशीही)

माणसं...स्वार्थी...लोभी... वासनांध...दुष्ट...माणसं...माणुसकी जपणारी, प्रेम करणारी, िंचतावणारी, खंतावणारी, दुसर्‍याचं दु:ख जाणणारी, हसणारी आणि रडणारीही...अनंत परी माणसांच्या...टर्नर सिंड्रोमची समस्या असलेल्या कोट्यधीश अमृताशी लग्न करून संपत्ती की माणुसकी या कात्रीत सापडलेला निशिकांत...नवर्‍याकडूनच कुंटणखान्यात विकली गेलेली अनामिका...वार्धक्यातही कॉलेजमधल्या कुमुदची आठवण मनाशी जपणारा ‘तो’...नवर्‍याच्या अपघाती मृत्यूच्यावेळी त्याच्या बरोबर असणार्‍या तरुणीविषयीचं गूढ उलगडू पाहणारी ऊर्मिला...दोन खतरनाक गुंडांचा खात्मा करणारे मनोहर आणि मदिरा...भावनांच्या आणि विचारांच्या वादळात सापडलेली घटस्फोटित सविता...रोजच्या धावपळीने उबगलेला अशोक...प्रवासात एकमेकींना भेटलेल्या दोन तरुणी, पारंपरिक गौरी आणि आधुनिक सान्वी...पोलिसांनी पकडलेलं असतानाही फाटलेला शर्ट घालून इन्टरव्ह्यूला पोचणारा विठ्ठल...माणसं बहुरंगी आणि त्यांच्या कथा बहुढंगी.

Book Details

ADD TO BAG