-
Dnyanyogi Eknath (ज्ञानयोगी एकनाथ)
संत एकनाथांच्या जीवनावरची ही कादंबरी आहे. एकनाथांच्या घराण्याची पूर्वपीठिका, त्यांचं जन्मरहस्य, त्यांचा जन्म ते त्यांनी घेतलेली जलसमाधी इथपर्यंतचा प्रवास या कादंबरीतून उलगडला आहे. एकनाथांचं बालपण, त्यांचा गुरूशोध, जनार्दन स्वामींशी त्यांची झालेली भेट, त्यांच्या सहवासात बहरत गेलेली त्यांची प्रतिभा, शूलभंजन नावाच्या छोट्याशा पर्वतावर त्यांनी केलेली तप:साधना, त्यांनी वेळोवेळी रचलेले अभंग, भारुडं, गवळणी, चतु:श्लोकी भागवताचं मराठीत केलेलं भाषांतर, चातुर्वर्ण्य, शिवाशिव, अस्पृश्यांना मिळणारी वागणूक याबद्दल त्यांनी वेळोवेळी आपल्या आचरणातून-बोलण्यातून व्यक्त केलेली नाराजी, त्यामुळे त्यांना सनातन्यांचा झालेला विरोध, गिरिजेशी झालेला विवाह, ज्ञानेश्वर-माउलींच्या समाधीचा जीर्णोद्धार आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचं एकनाथांच्या हातून घडलेलं कार्य इ.प्रसंग-घटनांतून त्यांचं संपन्न गृहस्थाश्रमी आणि आध्यात्मिक जीवन उलगडत जातं. एकनाथांच्या जीवनावरची रसाळ, भावसंपन्न कादंबरी.
-
Dnyanasuryache Akash-Sant Nivruttinath (ज्ञानसूर्य
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात. निवृत्ती हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू, तसेच सोपान-मुक्ताईचेही मोठे बंधू. त्यामुळे या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात; पण त्या घटनांकडे पाहण्याचा निवृत्तिनाथांचा दृष्टिकोन, भावंडांवर मायेची पाखर घालणं, ज्ञानदेवांचं गुरूपद स्वीकारणं इ. बाबींतून निवृत्तिनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या कादंबरीतून उलगडत जातात. निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या चार अलौकिक मुलांना जन्म देणार्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे ज्येष्ठ अपत्य म्हणून निवृत्तिनाथांचा जन्म होणं आणि तीन भावंडांना सामधिस्थ होताना त्यांना पाहावं लागणं, नाथपंथाची दीक्षा घेऊनही विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेणं, हेच निवृत्तिनाथांच्या जीवनातील वेगळेपण ही कादंबरी अधोरेखित करते.
-
Samarth (समर्थ)
समर्थ रामदासांची ही जीवनगाथा. जांब या गावातील त्यांचं बालपण, लहानपणापासूनच नदीशी, रामरायाशी, हनुमंताशी जडलेलं नातं, प्रत्यक्ष रामरायाने, हनुमंताने त्यांना दिलेला अनुग्रह, लहानपणापासूनच व्यायामाबद्दल त्यांना असलेलं प्रेम, त्यांची अखंड साधना, पुरश्चरण, बलोपासना, हिंदू धर्माऱ्यारक्षणासाठी ठिकठिकाणी स्थापिलेली मारुती मंदिरं, मठ, युवकांना संघटित करून, रामनवमी, हनुमानजयंतीसारऱ्याउत्सवातून अंगीकारलेली समाजाभिमुखता, शहाजी राजे आणि शिवाजी राजांशी असलेला अनुबंध, चाफळ येथील रामंदिराची स्थापना, शिवथर घळ येथे झालेली दासबोधाची निर्मिती, त्यांनी भारतभर केलेलं भ्रमण, सज्जनगडावरील त्यांचं वास्तव्य, त्यांचा शिष्यपरिवार आणि शेवटी सज्जनगडावर त्यांचं रामरूपात विलीन होणं...असा हा रामदासांचा जीवनप्रवास ओघवऱ्याभाषेत शब्दबद्ध केला आहे.
-
Bhaktichandra (भक्तिचंद्र)
संत नामदेव. एक निस्सीम विठ्ठलभक्त. आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आख्यानकर्ता, कुशल संघटक, कुशल नेता अशी नामदेवांची विविध रूपं या कादंबरीतून भेटतात. नामदेवांचं बालपण ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा हा प्रवास अतिशय रसाळ भाषेत उलगडला आहे. नामदेवांचं कौटुंबिक जीवन. नामदेव-ज्ञानेश्वर भेट, ज्ञानेश्वरादी भावंडं, चोखोबा इ. अन्य संतांबद्दल नामदेवांना असलेला जिव्हाळा. या सर्वांसह त्यांनी हातात घेतलेली भागवत धर्माची पताका. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबपर्यंत त्यांनी केलेली भटकंती आणि मराठीव्यतिरिक्त हिंदी, राजस्थानी, पंजाबी भाषेत केलेली अभंगरचना इत्यादीतून नामदेवांनी संत म्हणून केलेल्या अजोड कामगिरीचं दर्शन या कादंबरीतून घडतं. यवनांच्या राज्यातही मनाची सकारात्मकता कशी जपावी, हेच नामदेवांनी भक्तिमार्गातून, आपल्या कीर्तनांतून सूचित केलं आणि भागवतधर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली, हे त्यांचं महान कार्य अधोरेखित करणारी, भक्तिरसात चिंब भिजलेली प्रासादिक कादंबरी.
-
Dosti Duniyadari Aur Dil (दोस्ती दुनियादारी और दि
कबीर खान हा अनाथ मुसलमान मुलगा. काका-काकू कसंबसं सांभाळतात; पण देवधर सर आणि त्यांची बायको कालांतराने कबीरची जिम्मेदारी घेतात. तो खूप हुशार असतो. बोर्डात येतो, उत्तम शिक्षण घेतो. पुढे नोकरीतही झळकतो. प्रेमात पडतो, हिंदू मुलीशी लग्न करतो. त्यांना एक मुलगी होते. ‘तू मुस्लीम आहेस’ ही जाणीव समाज करून देत राहतो. कबीर तसं काही मानत नसला तरी मनात खोलवर अढी बसू लागते. मग तो मशिदीत जाऊ लागतो, कुराण वाचू लागतो, धर्मचर्चा करू लागतो. त्याच्या चार वर्षांच्या मुलीची, मीराची तिच्याहून तीन-चार वर्षांनी मोठ्या असलेल्या बांधकाम मजुराच्या मुलाशी, धनाशी असलेली मैत्री त्याला रुचत नाही. तो त्यांची मैत्री तोडायचा प्रयत्न करतो; पण त्याला यश येत नाही. मीरा वारंवार आजारी पडू लागते. तपासणीअंती तिच्या हृदयाला भोक असल्याचं निदान होतं. तिला हृदयरोपण करणं गरजेचं असतं. कोणाचं हृदय मिळतं तिला? सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी भावपूर्ण कादंबरी.
-
Aakash Zeltana (आकाश झेलताना)
शुभदा म्हणजे खरोखर आकाश झेलणारी गंगाच होती. हे करत असताना आलेल्या अनंत संकटांना तिनं आपल्या मजबूत खांद्यावर पेललं होतं. ग्रीष्मातल्या प्रखर सूर्यासारखी अनेक दाहक संकटे तिच्यासमोर एकापाठोपाठ एक उभी ठाकली होती; पण त्या सर्व संकटांवर मात करून तिनं आपल्या कर्तृत्वानं सुखाचं, कल्याणाचं, आनंदाचं वातावरण निर्माण केलं होतं. संकटांचं आकाश झेलून तिनं साठे परिवाराला सुखाची, समाधानाची सावली दिली होती. तिच्यात असलेल्या प्रत्येक गुणाचा कस लावून, कर्तृत्वाच्या कसोटीवर खरी उतरणारी शुभदा आता सर्वांना दिसणार होती सुखाचं, समृद्धीचं, समाधानाचं आकाश झेलताना! हेच तिच्या आयुष्याचं सार्थक होतं. हीच इतिकर्तव्यता होती.