Bhaktichandra (भक्तिचंद्र)
संत नामदेव. एक निस्सीम विठ्ठलभक्त. आद्य कीर्तनकार, आद्य चरित्रकार, आद्य आख्यानकर्ता, कुशल संघटक, कुशल नेता अशी नामदेवांची विविध रूपं या कादंबरीतून भेटतात. नामदेवांचं बालपण ते त्यांच्या निर्वाणापर्यंतचा हा प्रवास अतिशय रसाळ भाषेत उलगडला आहे. नामदेवांचं कौटुंबिक जीवन. नामदेव-ज्ञानेश्वर भेट, ज्ञानेश्वरादी भावंडं, चोखोबा इ. अन्य संतांबद्दल नामदेवांना असलेला जिव्हाळा. या सर्वांसह त्यांनी हातात घेतलेली भागवत धर्माची पताका. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाबपर्यंत त्यांनी केलेली भटकंती आणि मराठीव्यतिरिक्त हिंदी, राजस्थानी, पंजाबी भाषेत केलेली अभंगरचना इत्यादीतून नामदेवांनी संत म्हणून केलेल्या अजोड कामगिरीचं दर्शन या कादंबरीतून घडतं. यवनांच्या राज्यातही मनाची सकारात्मकता कशी जपावी, हेच नामदेवांनी भक्तिमार्गातून, आपल्या कीर्तनांतून सूचित केलं आणि भागवतधर्माची पताका महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवली, हे त्यांचं महान कार्य अधोरेखित करणारी, भक्तिरसात चिंब भिजलेली प्रासादिक कादंबरी.