-
Eka Kheliyane ( एका खेळीयाने)
मी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले . पुस्तकाची प्रूफं चाळताना एकदम वाटून गेलं. हे आपण खरंच इतकं केलं का ? काय नातं आहे या पात्रांशी ? आता वाटतं मी केलं नाही . ते झालं आपोआप आपापली व्यक्तिमत्व, स्वभाव आणि सारी वैशिष्ट्यं घेऊन हि पात्रं उभी राहिली. विविधरंगी , माझ्याशी काही साम्य नसलेली . मनात येतं जमा झाले हे चित्रविचित्र नग माझ्याभोवती , तर सर्जक असूनही मीच त्यांच्यात फार उपरा, अपरिचित , अनोळखी आणि मावळ वाटेन ! ते सगळे आणि मी यांचा परस्पर संबंध आजही मला बऱ्याचदा कोड्यात टाकतो ! ' एका खेळीयाने ' ही पाचवी सुधारित आवृत्ती , नवीन भूमिकांवरील नवीन लेखसंग्रह.
-
Baap Manus (बापमाणूस )
दिलीप प्रभावळकर, मेघना पेठे, सदाशिव अमरापूरकर, दत्तप्रसाद दाभोळकर, जयंत पवार, राजू परूळेकर, युवराज मोहिते, मेधा कुलकणीर्, निखिल वागळे ही सगळी विजय तेंडुलकरांच्या निकट मित्रवर्तुळातली मंडळी. या सर्वांच[...]
-
Tidha Aajchya Islamcha
"इस्लामचं आणि माझं पटेनासं झालंय. कशीबशी नखं रोवून लटकते आहे मी अल्लाहचे स्वयंघोषित राजदूत माझ्यापुढे आता आणखीन काय वाढून ठेवणार आहेत, या काळजीनिशी इस्लाममध्ये सुधारणेची गरज तेवढी आज, आता आहे तेवढी या आधी कधी नव्हती. काय करणार आहोत आपण याबाबतीत?...." आपल्या मुस्लीम बांधवाना लिहिलेल्या या जाहीर पत्रातून इरशाद मंजी आजच्या इस्लामच काय बिघडलंय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू पाहताहेत. इस्लाम मनोभावे पाळणार्या मंजी इस्लाम मध्ये कसे बदल घडू शकतात, कुराणाचा अर्थ कसा चुकीचा लावला जातोय याचं विश्लेषण करताहेत ; त्या अर्थाने आपल्या धर्माकडे सकारात्मक दृष्टीने पाहताहेत. 'तिढा आजच्या इस्लामचा' हे पत्रकार इरशाद मंजींचं पुस्तक म्हणूनच महत्वाचं आहे.