-
Wuthering Heights (वुदरिंग हाइट्स)
'वदरिंग हाइट्स' हे पुस्तक मूळतः १८४७ मध्ये एमिली ब्रॉन्टे यांच्या ' एलिस बेल' या टोपणनावाने प्रकाशित झाले होते . एमिली आणि तिच्या बहिणी, शार्लट व ॲन, या सर्वजणी या लिंग-अस्पष्ट टोपणनावांनी लिहीत असत, कारण कादंबऱ्या स्त्रियांनी लिहिल्या आहेत असे वाटल्यास त्यांचे स्वागत कसे होईल, याबद्दल त्यांना खात्री नव्हती. हे कदाचित थोडे विचित्र वाटेल, पण विचार केला तर, ही प्रथा आजही सुरू आहे. जोआन रोलिंग 'जेके रोलिंग' या नावाने का लिहितात? कारण त्यांच्या प्रकाशकांना वाटत होते की, लहान मुले स्त्रीने लिहिलेले पुस्तक वाचणार नाहीत. त्यामुळे ही प्रथा आजही सुरू आहे, अर्थात १८५० च्या दशकात, जेव्हा लोकांना वाटत होते की स्त्रिया काहीही करू शकत नाहीत, तेव्हा ही गोष्ट अधिक गंभीर होती.
-
Reshim Nant (रेशीम नांत)
जन्मापासून नातं सावालिसाराखं आपल्या बरोबर असतं. जन्मात आणि त्यानंतर नाती वाढत्या वयाबरोबर वाढत असतात. नात्यांची ही प्रभावळ वाढत राहणारी नात्यांबरोबर सहचर-सहचारिणीच नातं आणि त्या अनुषंगान अनेक स्थापित नाती आपण जपत असतो.नात्यांचे अनेक पदर गुंफत, आनंद, दू:ख ह्यात सहभागी होत होत कौटुंबिक जीवनाचा प्रवाह सुरलितपणे वहात असतो. ह्या प्रवाहात कौटुंबिक नात्यांबरोबर अनेक जोडलेल्या जीवाभावाचे प्रवाह येउन मिळतात, त्यात मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी रोजच्या व्यवहारातील अनेक व्यक्ती यांचाही सहभाग असतो. त्यांच्यांत नातं असतं आपलेपनाचं! नात्यांची शाब्दिक व्याख्या करता येत नाही; पण रक्तसंबंध प्रेमसंबंध ह्याचं व्यावहारिक रूप म्हणजे नातेसंबंधं, म्हणून नात्यांचे हे 'रेशीम धागे' गुंफताना आपण मनाने सतत सहज राहु या!
-
Kshano Kshani
वाचकप्रिय कादंबरीकर सुहास शिरवळकर यांच्या समर्थ लेखणीतून उतरलेली मनाची पकड घेणारी भन्नाट कादंबरी.