Reshim Nant (रेशीम नांत)
जन्मापासून नातं सावालिसाराखं आपल्या बरोबर असतं. जन्मात आणि त्यानंतर नाती वाढत्या वयाबरोबर वाढत असतात. नात्यांची ही प्रभावळ वाढत राहणारी नात्यांबरोबर सहचर-सहचारिणीच नातं आणि त्या अनुषंगान अनेक स्थापित नाती आपण जपत असतो.नात्यांचे अनेक पदर गुंफत, आनंद, दू:ख ह्यात सहभागी होत होत कौटुंबिक जीवनाचा प्रवाह सुरलितपणे वहात असतो. ह्या प्रवाहात कौटुंबिक नात्यांबरोबर अनेक जोडलेल्या जीवाभावाचे प्रवाह येउन मिळतात, त्यात मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी रोजच्या व्यवहारातील अनेक व्यक्ती यांचाही सहभाग असतो. त्यांच्यांत नातं असतं आपलेपनाचं! नात्यांची शाब्दिक व्याख्या करता येत नाही; पण रक्तसंबंध प्रेमसंबंध ह्याचं व्यावहारिक रूप म्हणजे नातेसंबंधं, म्हणून नात्यांचे हे 'रेशीम धागे' गुंफताना आपण मनाने सतत सहज राहु या!