Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)
जच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.