-
Why Mars And Venus Collide (व्हाय मार्स अँन्ड व्हीनस कोलाई)
जॉन ग्रे यांच्या या पुस्तकात पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी अनुक्रमे ‘मार्स’ आणि ‘व्हीनस’ ही रूपके वापरून त्यांच्यातील संबंधांचा सखोल विचार मांडला आहे. पुस्तकाचा विषय ‘कलह’ असला तरी लेखकाच्या खेळकर शैलीमुळे तो गंभीर न वाटता अत्यंत उद्बोधक वाटतो. आजच्या काळात जीवनातील गुंतागुंतीमुळे आणि संवादाच्या अभावामुळे स्त्री-पुरुष सहजीवन ताणतणावाखाली आले असल्याचे ग्रे सांगतात. आपल्या चित्तवृत्तींसाठी शरीरात स्रवणारी टेस्टोस्टेरॉन आणि ऑक्सिटोसीन यांसारखी संप्रेरके कशी कारणीभूत असतात, याचे सुंदर विवेचन यात केले आहे. ताणतणाव कमी करण्यासाठी संप्रेरकांचे प्रमाण संतुलित ठेवण्याकरिता आहारविहार आणि आचार-विचारांत कोणते बदल करावेत, याचे मार्गदर्शन पुस्तकात मिळते. वादविवादापूर्वीचे संकेत, भांडताना घ्यायची काळजी आणि तात्पुरती विश्रांती याबद्दलच्या टिप्सवाद टाळण्यास मदत करतात. एका जोडीदारानं दृष्टिकोन बदलल्यास नातेसंबंध कसे सुरळीत होतात आणि त्यासाठी समुपदेशकाचे महत्त्व किती असते, हे जॉन ग्रे यांनी प्रभावीपणे पटवून दिले आहे.
-
Children Are From Heaven (चिल्ड्रेन आर फ्रॉम हेवन)
जच्या काळात पालक आणि मुलं यांच्या नात्यांमध्ये सतत येणारा दुरावा कमी करण्यासाठी आणि पालकांनी कसं स्वत:ला बदलावं - मुलांशी संवाद साधत कसं त्यांना सक्षम करावं याबद्दल मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. मुलांशी संवाद साधताना ‘करू शकशील का?’ ऐवजी ‘करशील का?’ असा उल्लेख करावा; पण त्याने नेमका काय बदल होतो ते विस्तृतपणे मांडताना लेखक सांगतात की, ‘करू शकशील का?’ यात कुठेतरी शंका दडलेली आहे; तर ‘करशील का?’ यात पाल्यापोटी विश्वास दिसून येतो. परंतु, इथेही पालकांनी स्वत:वरचा आत्मविश्वास ढळू न देणे - प्रत्येक क्षणी नमतं न घेणे - मुलांना सतत स्पष्टीकरण न देणे हे करावे. मुलांना काही परिपूर्ण पालकांची गरज नसते; पण त्यांना नक्की असे पालक हवे असतात जे प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि आपल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी न मारता त्यांची जबाबदारी स्वत:च घेतील. जेणेकरून पालकांचं अनुकरण करताना मुलं स्वत:च्या चुकांची जबाबदारी स्वत:च घेण्यास सक्षम होतील. हेच पुस्तक सांगते.
-
A Long Way Gone (अ लॉँग वे गॉन)
ईश्माईल बाह या बालसैनिकाचं हे आत्मकथन. बंडखोरांनी त्याच्या गावावर केलेल्या हल्ल्यामुळे बंदुकीच्या गोळ्यांपासून जीव वाचवत, उपाशीतापाशी, कधी संशयावरून मार खात, कधी शेतात काम करत, उन्हापावसात अनवाणी पायांनी आपल्या भाऊ आणि मित्रांसह या गावातून त्या गावात भटकंती करणारा ईश्माईल... भाऊ आणि मित्रांशी त्याची चुकामूक झाल्यावर जंगलात एकटाच राहणारा ईश्माईल... कुटुंबाच्या सुखरूपतेची बातमी कळल्यावर कुटुंबाला भेटायला गेलेला आणि कुटुंबाची भेट न होता, बंडखोरांच्या अग्निकांडात कुटुंबं गमावलेला ईश्माईल...आर्मीत भरती होऊन बंडखोरांना कंठस्नान घालणारा ईश्माईल...युनिसेफने पुनर्वसन केल्यानंतरचा आणि त्याच्या अंकलचा आधार गवसलेला ईश्माईल...बालसैनिकांच्या व्यथा जगासमोर मांडणारा ईश्माईल...या त्याच्या प्रवासात तो पावलोपावली पाहतो मृत्यूचं तांडव, प्रचंड रक्तपात, अमानुष क्रौर्य आणि वारंवार अनुभवतो मृत्यूची दाट छाया...अंगावर शहारे आणणारं आत्मकथन
-
Level Up (लेव्हल अप)
‘लेव्हल अप’ हे पुस्तक तुमच्या आयुष्याप्रती आणि ध्येयांप्रती असलेल्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल घडवेल. “आत्तापर्यंत रॉब डायलच्या प्रशिक्षणाने लाखो लोकांना त्यांची मानसिकता बदलवण्यास आणि ध्येय प्राप्त करून देण्यास मदत केली आहे. ‘लेव्हल अप’ हे पुस्तक वाचून तुम्हालाही समजेल की, तुम्हाला हवं असणारं आयुष्य कसं मिळवायचं.” - हाल एलरॉड ‘दि मिरॅकल मॉर्निंग’ या पुस्तकाचे लेखक. “उज्ज्वल भविष्याची गुरूकिल्ली.” - लेविस होवेस ‘द ग्रेटनेस माईंड सेट’ या पुस्तकाचे लेखक. या पुस्तकात… तुम्ही कृती का करत नाही? कृती करण्यासाठी स्वतःला कसं भाग पाडावं? सवयी निर्माण कशा कराव्यात आणि त्यावर कसं टिकून राहावं? भीतीचे प्रकार आणि त्यांची वास्तविकता कार्यक्षमतेचं रहस्य – एकाग्रता मेंदूत बदल घडवून आणणारं शास्त्र चित्त एकाग्र करणे, प्रोत्साहन मिळवणे यामागचे शास्त्रीय सिद्धांत