-
Pyar ka Raag Suno(प्यार का राग सुनो)
रोमान्स म्हणजे काय? प्यार, मोहोब्बत, प्रेम? कसा बदलला रोमान्स आपल्या सिनेमांमध्ये? देव आनंदला रोमँटिक हिरो म्हणून प्रचंड फॅन फॉलोईंग का मिळालं? आणि शाहरुखचं आजचं यश नेमकं कशामुळे आहे? हा एक सरळ रेषेतला प्रवास आहे का? मग मधले दुवे कोणते आहेत? आणि का आहेत? भारतातला सिनेमा बोलत नव्हता तेव्हाही त्यात रोमान्स होता. स्वातंत्र्यापूर्वी तर तो अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होता. काळ बदलला, सिनेमा बदलला. मग प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या? देव आनंद आणि शाहरुख खान यांच्या रोमान्समधलं साम्य, मधल्या काळातले शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर यांच्यासारख्या नायकांचा रोमान्स, अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनने बदललेला कॅनव्हास, या रोमँटिक नायकांना मिळालेलं संगीत - गाणी, त्यांच्या नायिकांबरोबरची केमिस्ट्री या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. यात अनेक सुरस किस्से तर आहेतच, पण भारताच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्या त्या कालखंडावर केलेल्या परिणामांची चर्चाही आहे. द्वारकानाथ संझगिरी । मीना कर्णिक । हेमंत कर्णिक
-
Vedanech Gana (वेदनेच गाणं)
द्वारकानाथ संझगिरी यांचा एक आजवरच्या लिखाणापेखा वेगळा असा हा कथा संग्रह, आपल्या भोवती घडणाऱ्या दृश्य , अदृश्य अनुभवांना आपल्या अस्सल संझगिरी लेखणीतून टिपून मांडलेल्या आणि रंजनाबरोबर डोक्याला जाणिवेची चालना देणाऱ्या या कथा
-
Shatkant Ekach Sachin (शतकांत एकच सचिन)
शतकांत एकच सचिन सचिन तेंडुलकरनं वयाचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. काही मोजक्या लोकांना सचिनच्या या प्रवासाचं अगदी जवळून साक्षीदारहोता आलं. क्रिकेट समीक्षक आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी हे त्यापैकीच एक आहेत. खेळाबाहेरचा सचिन कसा आहे, याविषयी त्यांनी आपल्या ‘शतकात एकच...सचिन’ या आगामी पुस्तकात लिहलं आहे.
-
Khelandaji (खेलंदाजी)
क्रिकेट आणि संगीत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक! सामना, सकाळ, षटकार या माध्यमातून क्रिकेट मधील किस्से, टीका, टिप्पणी आपण लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या लेखनातून अनुभवले आहेत. त्यांचे लेखन कौशल्य जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा नावीन्याने आपल्यापुढे घेऊन येते. ‘खेलंदाजी’ या पुस्तकातील लेखसंग्रह वाचण्याचा योग मला आला आणि पुनः प्रत्ययाचा आनंद मिळाला. अजित वाडेकर, मोहम्मद सिराज, राहुल द्रविड, केन विल्यमसन, सुनील गावसकर, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन ते सचिन तेंडुलकर पर्यंत भारताच्या मौल्यवान हिन्यांचे परीक्षण या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते. विविध विषय मांडताना संझगिरींनी केलेला अभ्यास व त्यातील बारकावे हे विशेष भावतात. मुक्तपणे शब्दांची केलेली उधळण आणि तरीही सरळ, साधी भाषाशैली आपल्याला विषयाशी समरस करून टाकते. पत्रकारितेतील अनेक वर्षाचा गाढा अनुभव आणि अनुभवाने समृद्ध झालेले लिखाण वाचकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. रसिक वाचक या संधीचा मनमुराद लाभ घेतील याची मला खात्री वाटते.
-
Champagne Cricket (शाम्पेन क्रिकेट)
‘क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर द्वारकानाथ संझगिरी हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचे खेळाचे विश्लेषण आणि चित्रण चांगले आहे. या पुस्तकात त्याने खेळातील जवळजवळ सर्व मनोरंजक घडामोडी आणि पैलू सामावून घेतले आहेत. हे पुस्तक क्रिकेट रसिकांनी आवर्जून वाचावे असे आहे. त्यासाठी शुभेच्छा!
-
Falnichya Deshat (फाळणीच्या देशात)
दक्षिण आफ्रिकेतला वर्णद्वेष. पूर्व आणि पश्चिम जर्मनीला विभागणारी बर्लिन भिंत आणि भारताची फाळणी या सर्व घटना म्हणजे इतिहासाचा अविभाज्य काळा भाग. कालांतराने तो वर्णद्वेष विरघळतोय. भिंत तुटतेय... वारे वाहू लागलेयत. हा नवा इतिहास घडताना, तुटलेली मनंजुळत असलेली पाहताना एका संवेदनाक्षम पत्रकाराच्या मनात उठलेल्या स्पंदनांचं हे एक शब्दरूप...