-
Pyar ka Raag Suno(प्यार का राग सुनो)
रोमान्स म्हणजे काय? प्यार, मोहोब्बत, प्रेम? कसा बदलला रोमान्स आपल्या सिनेमांमध्ये? देव आनंदला रोमँटिक हिरो म्हणून प्रचंड फॅन फॉलोईंग का मिळालं? आणि शाहरुखचं आजचं यश नेमकं कशामुळे आहे? हा एक सरळ रेषेतला प्रवास आहे का? मग मधले दुवे कोणते आहेत? आणि का आहेत? भारतातला सिनेमा बोलत नव्हता तेव्हाही त्यात रोमान्स होता. स्वातंत्र्यापूर्वी तर तो अधिक मोकळेपणाने व्यक्त होत होता. काळ बदलला, सिनेमा बदलला. मग प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या? देव आनंद आणि शाहरुख खान यांच्या रोमान्समधलं साम्य, मधल्या काळातले शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर यांच्यासारख्या नायकांचा रोमान्स, अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅनने बदललेला कॅनव्हास, या रोमँटिक नायकांना मिळालेलं संगीत - गाणी, त्यांच्या नायिकांबरोबरची केमिस्ट्री या सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक आहे. यात अनेक सुरस किस्से तर आहेतच, पण भारताच्या सामाजिक परिस्थितीमुळे त्या त्या कालखंडावर केलेल्या परिणामांची चर्चाही आहे. द्वारकानाथ संझगिरी । मीना कर्णिक । हेमंत कर्णिक
-
Imperfect (इम्पर्फेक्ट)
हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी माझं यश आणि अपयश याविषयी माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी प्रत्येक व्यक्ती एक आगळं आयुष्य जगत असते. प्रत्येकाच्या जगण्याच्या या कहाण्या नेहमीचं रंजक असतात. कोणीही माणूस निरर्थक आयुष्य जगत नाही. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीपासून तरुण , नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, 'माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या ; तू नवीन वीस चुका कर.'
-
Mi Bahurupi Ashok Saraf (मी बहुरूपी अशोक सराफ)
या आठवणी आहेत. आठवणी माझ्या आजवरच्या प्रवासातल्या. नट म्हणून आलेल्या बर्यावाईट अनुभवांच्या. माझ्यावर झालेल्या संस्कारांच्या आणि मला भेटलेल्या , सांभाळून घेतलेल्या माणसांच्या. माझ्यासारख्या नायकाचा चेहरा नसणार्या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टिव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या हा म्हटल तर चमत्कारच म्हणायला हवा. म्हटल तर? पण का म्हणायच? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केल ते अतिशय गंभीरपणे, प्रामणिकपणे आणि मन लावून केल. त्यात कधीही हयगय केली नाही. कोणतही काम, मग ते छोट असो की मोठ, नायकाच असो की खलनायकाच, विनोद असो की गंभीर, मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनच केल. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज मी जो काही आहे, जिथे आहे ते या सगळ्याच फळ आहे. या क्षेत्रात वावरणारी, काहीतरी करू इच्छिणारी तरूण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच, पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर? या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली, कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचिंत आधार सापडला तरी या पुस्तकान खूप काही साधल अस मला वाटेल.
-
Swargakanya (स्वर्गकन्या )
सनसनाटी चिनी इतिहासातील एकमेव स्त्री सम्राटाची, उ छाव्ची नाट्यमय सत्यकथा. वयाच्या १३व्या वर्षी उ छाव् सम्राटाचं अंगवस्त्र बनली. आपल्या सौंदर्य आणि हुशारीचा कौशल्यपूर्ण वापर तिने केला. कारस्थाने रचली. सम्राटाला अंकित करून प्राचीन चीनमधल्या सर्वांत मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर कबजा मिळवला. आपल्या शत्रूंचा तिने निर्दयपणे खातमा केला. तिचा शृंगारातील तरबेजपणा, तिचे रक्तरंजित बंड ते तिने स्वतःला देव म्हणून घोषित करण्यापर्यंतचा सनसनाटी प्रवास.
-
Chehryamagcha Chehra-Gautam (चेह्र्यमाग्चा चेहरा -
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार. ज्यांच्या किमयेने अमिताभपासून करिनापर्यंत आणि टाटांपासून हुसेनपर्यंत अनेक नामवंतांचे चेहरे उजळून निघाले या चेहरयांमागचा खरा चेहरा कसा होता? गौतम राजाध्यक्ष यांच्या आयुष्याचा हा प्रवासही कॅमे-याइतकाच अनोखा म्हणता येईल. त्याचीच ही कहाणी मराठीत प्रथमच.