Mi Bahurupi Ashok Saraf (मी बहुरूपी अशोक सराफ)

By (author) Meena karnik Publisher Granthali

या आठवणी आहेत. आठवणी माझ्या आजवरच्या प्रवासातल्या. नट म्हणून आलेल्या बर्‍यावाईट अनुभवांच्या. माझ्यावर झालेल्या संस्कारांच्या आणि मला भेटलेल्या , सांभाळून घेतलेल्या माणसांच्या. माझ्यासारख्या नायकाचा चेहरा नसणार्‍या अभिनेत्याला नाटक, सिनेमा आणि टिव्ही या तिन्ही माध्यमांमधून इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका करायला मिळाल्या हा म्हटल तर चमत्कारच म्हणायला हवा. म्हटल तर? पण का म्हणायच? कारण केवळ नशिबाच्या हवाल्यावर मला इथवर मजल गाठता आलेली नाही. जे काम केल ते अतिशय गंभीरपणे, प्रामणिकपणे आणि मन लावून केल. त्यात कधीही हयगय केली नाही. कोणतही काम, मग ते छोट असो की मोठ, नायकाच असो की खलनायकाच, विनोद असो की गंभीर, मी ते माझ्या पूर्ण क्षमतेनच केल. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आज मी जो काही आहे, जिथे आहे ते या सगळ्याच फळ आहे. या क्षेत्रात वावरणारी, काहीतरी करू इच्छिणारी तरूण मंडळी आपापली लढाई तर लढत असणारच, पण त्यात माझ्या अनुभवांची भर पडली तर? या पुस्तकामधून त्यांना थोडी स्फूर्ती मिळाली, कामाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या नैराश्याच्या काळात किंचिंत आधार सापडला तरी या पुस्तकान खूप काही साधल अस मला वाटेल.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category