-
Vijay Stambh (विजय स्तंभ)
रामायणप्रसाद वडिलांचा फोटो घेऊन बसे.वेगवेगळ्या कोनातून फिरवून बगत राही.अस्पष्टशी आकृती वरच्या बाजूला वळलेल्या आकडेबाज मिश्या स्पष्ट दिसत .तो फोटो कधी काळी स्पष्ट सुंदर असावा. थोडा आईच्या अश्रूंनी अस्प्ष्ठ केला व थोडा विजयस्तंभाच्या प्रभावाने. त्याने कल्पनेत जेव्हा जेव्हा वडिलांचा चेहरा पहिला , त्याचा डोळयासमोर विजयस्तंभ येउन उभा राहिला. आजोबांबरोबर विजयस्तंभाजवळ जाऊन तो विचारीत असे, "आजोबा , तुम्हांला असे नाही वाटत की हा विजयस्तंभ माझे बाबा आहेत . यांना एक धड आहे, एक चेहरा आहे, धडाला हातपाय नाहीत आणि चेहऱ्यावर नाकडोळे नाहीत ."
-
Mi Aani Mi (मी आणि मी)
हो मी मी व्यक्तीरिक्त काही बोलत नाही. मी ना समाजसुधारक आहे ना समाजसेवक. इतकेच नव्हे तर सामाजिक प्राणी सुद्धा नाही. माझ्या बाहेर जे काही घडतं ते माझ्या मी चा हिस्सा बनल्याशिवाय मी त्याला कागदावर उतरवू शकत नाही. सगळे कलाकार हेच करतात. जर ते खोट बोलत नसतील तर ! मी खोट बोलतो साहित्याबद्दल नाही तर मी लिहतो आपल्याबद्दल, ध्येयाचा शोध घेतो तो आपल्या पध्दतीने. मी माझ्या मी ची बाजू घेणारा आहे. अभिव्यक्त करणारा आहे. मी माझ्या मी वर प्रेम करणारा आहे. एकानिष्ठेने प्रेम फक्त स्वतावर केल जात.
-
Bhakatichya Ubaratyavar (भक्तीच्या उंबरठयावर)
अनेक दिवाळी अंकांतून ,मासिकांतून कथा ,कविता ,लेख प्रकाशित . अनेक संत चरित्रावर आजपर्यंत जवळजवळ ५४ प्रवचने . शेगावच्या गजानन महाराजांच्या विजयग्रंथावर गजानन गीतगंगा हि काव्यात्मक रचना . गजानन गीतगंगेच्या जवळजवळ १०० कार्यक्रमात निवेदक म्हणून कार्यरत . गजानन गीतगंगा या पुस्तकाची राज्य मराठी विकास संस्थेच्या मराठी ग्रंथ सूचीत(१९७९-८९) या संदर्भ ग्रंथात नोंद