Mi Aani Mi (मी आणि मी)
हो मी मी व्यक्तीरिक्त काही बोलत नाही. मी ना समाजसुधारक आहे ना समाजसेवक. इतकेच नव्हे तर सामाजिक प्राणी सुद्धा नाही. माझ्या बाहेर जे काही घडतं ते माझ्या मी चा हिस्सा बनल्याशिवाय मी त्याला कागदावर उतरवू शकत नाही. सगळे कलाकार हेच करतात. जर ते खोट बोलत नसतील तर ! मी खोट बोलतो साहित्याबद्दल नाही तर मी लिहतो आपल्याबद्दल, ध्येयाचा शोध घेतो तो आपल्या पध्दतीने. मी माझ्या मी ची बाजू घेणारा आहे. अभिव्यक्त करणारा आहे. मी माझ्या मी वर प्रेम करणारा आहे. एकानिष्ठेने प्रेम फक्त स्वतावर केल जात.