-
Dukhri Nas (दुखरी नस)
हलक्या फुलक्या विषयांची दखल घेत मयुरेश वाटावे या तरुण, होतकरू पत्रकाराने 'दुखऋ नस' नेमकी पकडली आहे. वाटावे यांची शैली कधी उपरोधिक असते टार कधी चिंतानाची गंभीर किनार तिल असते. मात्र उपदेश, संदेश, लोकशिक्षण वा प्रबोधानाचा आव ते आगत नाहित अन् त्यातच त्यांच्या लिखाणाचे मर्म आहे.
-
Gomantak Sanskrutichya Paulkhuna (गोमंतक: संस्कृती
प्रस्तुत पुस्तकाच्या निर्मितिने गोमंताकातील रसिक मराठी वाचाकाना त्यांच्या लोक्संस्क्रुतिचा पुन: प्रत्यय घेता येइल. त्याच्याबरोबर महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रतील जीज्ञासु मराठी वाचाकाना गोमंताकातील लोकसंस्कृतीचा नव्याने परिचय करून घेण्याची संधी मिळेल. प्रस्तुत पुस्तकातील प्रतिपाद्य विषयाला डॉ. फळदेसाइ यानी विविध दृष्टीकोनतुन सदर केले आहे. त्यामद्धे जाशी विविधता आहे तशीच तत्संबंधीच्या भविष्य कालीन गरजाकड़े लक्ष वेधान्याची प्रयत्न आहे. प्रस्तुत पुस्तकांच्या रुपाने गोमंताकाच्या मराठी वाड्मयसृष्टीतील एक मोलाच्या ग्रंथाची भर पडलेली आहे.
-
Navlai
विनोदी कथा लिहिणं हे विशेषच जबाबदारीचं काम असतं. विनोदाचं बोट सोडायचं नाही आणि कथेचा घाटही बिघडवायचा नाही. सुखठणकरांना हे उत्तम साधलेलं आहे. गंभीर समस्यांकडेदेखील सुखठणतर विनोदी चष्म्यातून पाहतात आणि स्थित्यंतरीय जीवनाचा मजेदार शोध घेतात. ‘एका स्वामीची क्रांती’, ‘डिंक डिंक ना रहा’, ‘सीआर गेला खड्ड्यात’, ‘सॅमची आई’ वगैरे कथांमधून विनोदाची फवारणी करतानाच सुखठणकरांनी विषयाचं गांभीर्य कमी होऊ न देण्याचं भान राखलेलं आहे. ही ‘नवलाई’ नटली आहे, अगदी आजच्या ताज्या विषयांवरील आणि माणसांच्या विविध वृत्तीप्रवृत्तींभोवती गुंफलेल्या कथांनी. सुखठणकरांचे नर्मविनोदी लेखन वाचकांना तणावमुक्त करून रोजच्या समस्यांना भिडण्यासाठी नवा जोम प्राप्त करून देतं. सुधीर सुखठणकर यांनी मराठी साहित्यात विनोदी लेखक म्हणून आपली वैशिष्ट्यपूर्ण मुद्रा या आधीच उमटवलेली आहे. वाचकांना पुन्हा एकदा याचा प्रत्यय ’नवलाई’ आणून देईल असा विश्वास वाटतो.