-
Khagolshastratil Nobel Paritoshike (खगोलशास्त्रातील नोबेल पारितोषिके)
आतापर्यंत ११ वर्षे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक खगोलशास्त्रज्ञांना दिले गेले आहे. नवीनतम तंत्रे व उपकरणे वापरून विषयाच्या आघाडीवर केलेले त्यांचे शोधकार्य, हायस्कूल पास केलेल्या विद्यार्थ्यांनाही समजेल अशा प्रकारे अतिशय सोप्या भाषेत या पुस्तकात समजावून सांगितले आहे. असे करताना प्रत्येक परितोषिकाच्या विषयाची संपूर्ण पार्श्वभूमी आधी विशद केली आहे. यामुळे या पुस्तकात संपूर्ण खगोलशास्त्राचा आढावा आलेला आहे. शोधकार्य समजण्यासाठी गरजेच्या असलेल्या भौतिकशास्त्रातील संकल्पना अधिक तपशिलाबरोबर चौकटीत दिल्या आहेत. अनेक किस्से समाविष्ट केल्याने वाचकांची गोडी शेवटपर्यंत कायम राहते. विद्यार्थी तसेच खगोलशास्त्रात रुची असलेल्या सर्वांसाठी, खगोलशास्त्रातील नवीनतम घडामोडी जाणून व समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल.
-
Taryanchee Jeevangatha (ताऱ्यांची जीवनगाथा)
निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो ताऱ्यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? 'तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसऱ्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा । डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.