-
Taryanchee Jeevangatha (ताऱ्यांची जीवनगाथा)
निरभ्र आकाशात सूर्यास्तानंतर आकाशाच्या काळ्याभोर पडद्यावर एकामागून एक तारा उमटू लागतो. हे तारे येतात कुठून? कसा होतो ताऱ्यांचा जन्म? ते का लुकलुकतात? त्यांच्या तेजाचे रहस्य काय? काय? तारे नष्ट होतात का? आपला सूर्यही एक तारा - मग तोही नष्ट होईल का? 'तारा तुटतो' म्हणजे नेमके काय घडते? दुसऱ्या एखाद्या तारामंडळात आपल्यासारखे सजीव असतील का? प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी उमटलेल्या या प्रश्नांची शास्त्रीय अन् तर्कशुद्ध उत्तरे मिळतील या पुस्तकातून ! जागतिक दर्जाचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उमटलेल्या मूळ हिंदी पुस्तकाचा । डॉ. पुष्पा खरे यांनी केलेला सुबोध, रसाळ मराठी अनुवाद.
-
Mayajaal (मायाजाल)
डॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल
-
Samagra Jayant Naralikar (समंग्र जयंत नारळीकर)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या – या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !