-
An Island (ॲन आयलंड)
"सॅम्युअल प्रदीर्घ काळापासून एकटा राहिला आहे. ठरावीक कालावधीनं सामानाचा पुरवठा करणारी बोट आणि भूतकाळात मुख्य भूमीवरून आलेले सरकारचे प्रतिनिधी यांनीच केवळ इथं भेट दिली आहे. तो दीपस्तंभाची व्यवस्था पाहतो आणि आपल्या कोंबड्या सांभाळत किनार्यावर येणार्या लाटा बघत राहतो. मग एका सकाळी, त्याच्या सोबतीसाठी आणि त्याच्या एकांतवासाला धोका निर्माण करण्यासाठी समुद्र कुणाला तरी घेऊन आला असल्याचं त्याला आढळतं... अपराधभाव आणि भीती, मैत्री आणि नकार यांविषयीची; तसंच `घर` या संकल्पनेच्या अर्थाविषयीची उत्कट आणि प्रभावी कादंबरी. "
-
The Vault of Vishnu (दि व्हॉल्ट ऑफ विष्णू)
अश्विन संघी यांचे हे नेहमीप्रमाणे गूढ आणि उत्कंठावर्धक कथानक आहे, जिथे इतिहास आणि मिथक यांचा मिलाप होतो. `द व्हॉल्ट ऑफ विष्णू` या कादंबरीमध्ये पल्लवाचा राजकुमार कंबोडियाचा राजा होण्यासाठी जातो. सोबत त्याने जपून नेलेली गुपितेच अनेक शतकांनंतर युद्धाची कारणे बनतात. प्राचीन चीन मधील एक बुद्ध साधू एका कोड्याचे धागे शोधत भारतात येतो. ते कोडे सोडवल्याने त्याचा राजा सर्वशक्तिशाली होणार असतो. भारत - चीन सीमेवरील युद्धामुळे ज्ञानसंवर्धनासाठी आदिवासी जमातींनी चालवलेला लढा दुर्लक्षित राहतो. दरम्यानएक शास्त्रज्ञ कांचीपुरम मधील मंदिरातील प्राचीन लिपीचा अर्थ उलगडण्यात यशस्वी होतो. या प्रवासात सिक्रेट एजंट त्याच्या मागावर असतात. या सगळ्या वादळात एक अन्वेषक सापडते. तिचा स्वतःचाही गुंतागुंतीचा भूतकाळ आहे. जगाचा तोल सांभाळला जाण्यासाठी तिला काळ वेळेविरुद्ध शर्यत करावी लागते.