-
Asa Lutla Bharat (असा लुटला भारत)
’वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.
-
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
नैराश्य ही सबंध जगाला भेडसावणारी समस्या. दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली असते. नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शैलजा सेन यांचा मानसिक आरोग्यातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस गोष्टरूपात या पुस्तकात समोर येतात. या गोष्टीतून आणि रूग्णांसोबतच्या त्यांच्या संवादातून प्रत्येकाला आपल्या मानसिक दुखण्यावरही इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक तुम्हाला समजून घेणारी मैत्री बहाल करतं.