-
Vadivasal Chitramay (वाडीवासल चित्रमय)
वाडिवासल ही अभिजात तमिळ कादंबरीवर आधारित चित्रमय कादंबरी आहे, सी.एस. चेलप्पा यांच्या या कादंबरीचे पेरुमाल मुरुगन आणि चित्रकार अप्पुपेन यांनी रुपांतरण केले आहे. ही कथा पारंपरिक तमिळ खेळ जल्लीकट्टूच्या पार्श्वभूमीवर घडते, जिथे पीची नावाचा एक तरुण बैलाला ताब्यात घेण्याच्या मैदानात प्रवेश करतो. त्याचा उद्देश आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणे असतो, जो एका अजिंक्य बैलाच्या हल्ल्यात झाला होता. ही कथा मनुष्य विरुद्ध बैल या तीव्र संघर्षावर केंद्रित आहे आणि त्यातून धैर्य, सूड, अभिमान तसेच ग्रामीण तमिळ संस्कृती यांसारख्या विषयांचा शोध घेतला जातो. ग्राफिक नॉवेलमध्ये कृष्ण-धवल शैलीचा प्रभावी वापर करून मैदानातील तणाव, भावना आणि संघर्षाची उग्रता अत्यंत प्रभावीपणे दाखवली आहे.
-
Vaghache Katade Pangharnara Shur Sardar (वाघाचे कातडे पांघरणारा शूर सरदार)
अरब राजा रोस्तेवांचा पराक्रमी, निष्ठावान सेनापती अवथांदिल आणि राजाची रूपवती कन्या थीनाथीन, परस्परांच्या प्रेमात आहेत. एकदा त्यांच्या राज्यात एक शूर वीर येतो आणि त्याच्या चौकशीसाठी गेलेल्या राजाच्या सैनिकांना ठार मारून नाहीसा होतो. त्या शूर वीराच्या शोधात अवथांदिल निघतो. खडतर प्रवासानंतर महत्प्रयासाने त्याला तो शूर वीर भेटतो, त्याचं नाव असतं तारियल. तो अखिल हिंदुस्थानचा राजा असतो. त्याची प्रेयसी राजकन्या नेस्तां-दारेजां हिचं ज्या राजकुमाराशी लग्न होणार असतं, त्याला तो ठार मारतो आणि परागंदा होतो. त्याचं राज्य आणि प्रेयसी दोन्हीपासून दुरावतो. त्याची प्रेयसी शत्रूच्या हाती लागते. विरहाने वेडापिसा झालेला तारियल तिचा ठावठिकाणा माहीत करून घेण्यासाठी जंग जंग पछाडत असतो. तिला शोधून आणण्याचं आव्हान अवथांदिल स्वीकारतो. तारियल आणि नेस्तां-दारेजांची भेट घडवण्यात तो यशस्वी होतो का? उत्कट प्रेमाची, मैत्रीची, निष्ठेची उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकणारी महाकाव्यरूपी गाथा.
-
Cheharyamagchi Reshma (चेहऱ्यामागची रेश्मा)
सतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे काही क्षणांतच तिचं शरीर जळू लागलं. पण ते अॅसिड तिच्या हृदयातील जगण्याची ठिणगी मात्र विझवू शकलं नाही. दुर्दैवाच्या गर्तेतून रेश्माने झेप घेतली ते थेट जागतिक सन्मानाच्या पातळीवर. न्यू यॉर्क फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक करणारी, अॅसिड हल्ल्यातून वाचलेली पहिली मुलगी म्हणून तिचं नाव जगभरात गाजलं. रेश्माच्या जिद्दीची प्रेरणादायी आणि सकारात्मक जीवनसंदेश देणारी ही कहाणी.