-
DHAG (धग)
सेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेलं हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरीत व्हावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे वैशिष्ट्य असणाऱ्या मुरुगन यांची लक्षवेधी कादंबरी. आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल. "Young Selvan's life is no longer the same. His family's ancestral land has been sold in order to make way for the construction of a housing colony. Now the verdant landscape of his childhood has been denuded, while Selvan and his family are compelled to move to much smaller lodgings. In the ensuing years, as the pressures of their situation simmer to a boil, Selvan observes his family undergo dramatic shifts in their fortunes as greed and jealousy threaten to overshadow their lives. Murugan's first novel, which launched a splendid literary career, is a tour de force. Now translated for the first time, it poses powerful questions about the human cost of relentless urbanization in the name of progress.
-
NADIMUKH(नदीमुख)
कुमारासुर, त्याची पत्नी मंगासुरी आणि त्यांचा मुलगा मेघास, असं एक त्रिकोणी कुटुंब. कुमारासुर सरकारी नोकरीत आहे. एकूणच, तंत्रज्ञानाविषयी कुमारासुर उदासीन आणि नकारात्मक आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणारा मेघास कुमारासुराकडे नवीन महागड्या मोबाइलची मागणी करतो. मेघासला मोबाइल गेम खेळण्यासाठी हवा असेल किंवा ब्ल्यू फिल्म पाहण्यासाठी हवा असेल किंवा सेल्फी काढण्यासाठी पाहिजे असेल, असा समज कुमारासुर करून घेतो. टेक्नॉलॉजीमुळे आणि आजूबाजूच्या वातावरणामुळे मेघास बिघडणारच अशी ठाम समजूत करून घेतल्यामुळे कुमारासुर विचित्र मनोव्यापारांमध्ये भोवंडत असतो. मंगासुरीला त्याच्या अशा विचित्र वागण्यामुळे त्याची काळजी वाटायला लागते. ती कुमारासुराच्या मित्राला, अधिकासुराला त्याला यातून बाहेर काढण्याची विनंती करते. अधिकासुराच्या सहवासात कुमारासुराच्या मनावरचं मळभ नाहीसं होतं. आजूबाजूच्या वास्तवाचं रुपकात्मक चित्रण करणारी कादंबरी. Estuary brings alive the different ways—absurd and endearing by turns—in which a man and his young son navigate the contemporary world. In the process, it peels back the layers of Kumarasurar’s loneliness: the hurt of a married man whose wife cares only for the happiness of their child, the endless monotony of an office job and the struggle of the salaried middle-class to give their children the best chance of success. Perumal Murugan’s latest novel, his first in an urban setting, is also a razor-sharp parody of everything from e-commerce to the fitness industry, art appreciation to political manipulation, cram schools to social networks. Through a meditative exploration of a father’s emotional landscape, Murugan tells of a world wrecked by unchecked consumerism and an obsession with growth, where technology overrides common sense and degrees don’t guarantee education. And, with characteristic tenderness, he also weaves in a way to redemption.
-
Ardhanaari (अर्धनारी)
एक अनोखी कथा. दोन वेगळे शेवट. पेरुमल मुरुगन यांच्या वन पार्ट वुमन (माधुरोबागन) या कादंबरीच्या घवघवीत यशानंतर काली आणि पोन्ना यांच्यातल्या उत्कट प्रेमाच्या अशा चिंधड्या उडालेल्या पाहून वाचक मोठ्या विमनस्क स्थितीत जातात. या प्रेमी जोडप्याचं पुढे काय होणार? ट्रायल बाय सायलेन्स (मौन बचाव/अर्धनारी) ही कादंबरी म्हणजे मूळ कादंबरीच्या दोन कल्पक आनुषंगिक भागांपैकी एक होय. ‘वन पार्ट वुमन’च्या शेवटी कालीने पोन्नाला शिक्षा करायचा कठोर निश्चय केलेला असतो. तिने त्याचा पूर्ण विश्वासघात केल्याची त्याची खात्रीच पटलेली असते. परंतु, पोन्नाचा स्वत:चा दोष नसताना तिला जे प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं जातं, त्यापायी तीही अतिशय अस्वस्थ होते. मंदिरोत्सवपश्चात दोघांनाही त्यांच्या आधीच्या आदर्श सहजीवनाच्या नव्या आणि कठोर अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. मुरुगन यांच्या जादुई बोटांतून सहज झरणारी ही कथा एका आश्चर्यकारक आणि नाट्यपूर्ण निष्कर्षाला पोहोचते.