-
DHAG (धग)
सेल्व्हनचं आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. गृहनिर्माण वसाहतीच्या योजनेखाली त्यांना आपली वडिलोपार्जित जमीन विकावी लागली. बालपणी त्याच्या मनात ठसलेलं हिरव्यागार निसर्गाचं चित्र विस्कटून पुसून गेलं. सेल्व्हनला व त्याच्या कुटुंबाला छोट्या जागेत स्थलांतरीत व्हावं लागलं. त्यानंतरच्या काळात त्याच्या कुटुंबावर ओढवलेल्या नाना प्रसंगांच्या दबावामुळे घरातील वातावरण तापू लागलं. लालसा व मत्सर या घातक वृत्तींनी आयुष्य झाकोळून गेल्यामुळे नशीबाचे फासे उलटे पडू लागले, हे सेल्व्हनला कळून चुकलं. मानवी संबंधांतील गुंतागुंतीचं आणि ताणतणावांचं भेदक चित्रण व विषयातील नाविन्य हे वैशिष्ट्य असणाऱ्या मुरुगन यांची लक्षवेधी कादंबरी. आज सर्वत्र सुरू असलेल्या अथक शहरीकरणामुळे खालावलेल्या जीवनाची व ढासळलेल्या जीवनमूल्यांची वाचकांना तीव्रतेने जाणीव करून देईल. "Young Selvan's life is no longer the same. His family's ancestral land has been sold in order to make way for the construction of a housing colony. Now the verdant landscape of his childhood has been denuded, while Selvan and his family are compelled to move to much smaller lodgings. In the ensuing years, as the pressures of their situation simmer to a boil, Selvan observes his family undergo dramatic shifts in their fortunes as greed and jealousy threaten to overshadow their lives. Murugan's first novel, which launched a splendid literary career, is a tour de force. Now translated for the first time, it poses powerful questions about the human cost of relentless urbanization in the name of progress.
-
An Incomplete Life By Vijaypat Singhaniya (अन इनकॉ
विजयपत सिंघानिया म्हणजे भारतीय उद्योगसमूहातलं अग्रगण्य नाव. पण त्यांची ओळख फक्त रेमंड उद्योग समूहापुरती मर्यादित नाही. हा उद्योगपती ओळखला जातो त्याच्या अगम्य जिद्दीसाठी. मग ते हॉट एअर बलुनमधून ६९ हजार फुटांवरून उड्डाण घेणं असो वा छोट्या विमानातून केलेला विमान प्रवासाचा विक्रम असो. विजयपत आपल्या जीवनप्रवासातून नवा आदर्श घालून देतात. तर त्याच वेळी कौटुंबिक पातळीवर एका हतबल पित्याची कहाणीही ते सांगतात. आपल्या जीवनानुभवांवर कोणताही पडदा न टाकता अभिनिवेषहीन पद्धतीने मांडलेलं त्यांचं हे आत्मकथन म्हणूनच वाचकांवर मोहिनी टाकणारं ठरतं.
-
Mind Master (माइंड मास्टर)
विश्वनाथ आनंद म्हणजे 64 घरांचा राजा. बुद्धिबळाच्या पटावरचा अनभिषिज्ञ सम्राट. तब्बल पाच वेळा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवणारा विजेता. त्यांच्या या आत्मकथनात लहानग्या विशीपासून ते विश्वविजेत्याच्या जडणघडणीतील अनेक टप्पे उलगडत जातात. बुद्धिबळाच्या गंतवून टाकणाऱ्या पटाइतकंच हे आत्मकथन गुंतवून टाकतं. वयाच्या सहाव्या वर्षी सुरू झालेला आनंदचा प्रवास, विश्वविजेतेपदावर वर्चस्व गाजवत त्यानं रशियाची मोडीत काढलेली मक्तेदारी, जगाच्या कानाकोपऱ्यात स्पर्धांसाठी केलेला प्रवास, क्रीडा प्रकारातलं राजकारण, त्याचं कुटुंब ते अगदी निवृत्तीच्या संकेतांमधली त्याची तगमग अशा अनेक गोष्टींना स्पर्शून जातात.
-
The Cut Out Girl (द कट आउट गर्ल)
दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंवरील अत्याचार म्हणजे मानवी क्रूरतेची परिसीमा. या क्रूरतेला आपली पोर बळी पडू नये म्हणून लिनच्या पालकांनी तिला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवलं. फोस्टर कुटुंबानं तिला लपवलं आणि नाझीवादापासून तिचं संरक्षणही केलं. पण कालांतरानं तिला फोस्टर कुटुंबापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतरच्या तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली. तिनं मानवी विकृतीच्या कित्येक तऱ्हा अऩुभवल्या. फोस्टर कुटुंबाचा नातू अर्थात बार्ट व्हॅन एस तिच्या या हेलावून टाकणाऱ्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता दुसऱ्या महायुद्धानं घडविलेल्या वेदनादायी विध्वंसावरही प्रकाश टाकतात.
-
Chanakyacha Mantra (चाणक्याचा मंत्र)
`चाणक्याचा मंत्र`. चाणक्य कोण हे सर्व भारतीयांस चांगलेच ठाऊक आहे. इसवीसन पूर्व ३४०. परिस्थितीने होरपळलेला पण ध्येयाने झपाटलेला एक ब्राह्मण युवक आपल्या परमप्रिय पित्याच्या निर्घृण हत्येचा सूड घेण्याची प्रतिज्ञा करतो. थंड डोक्याचा, कावेबाज, कठोर व प्रचलित नीतिमूल्यांना न जुमानणारा तो युवक, भारतातील सर्वश्रेष्ठ रणनीतिकार बनतो. अलेक्झांडरच्या आक्रमणाविरुद्ध विस्कळीत झालेल्या भारताला एकसंघ बनवण्यात यशस्वी होतो. चंद्रगुप्ताला विशाल मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर विराजमान करतो. आजच्या काळात म्हणजे अडीच सहस्राद्बीनंतर चाणक्य पुन्हा गंगासागर मिश्राच्या रूपात अवतार घेतो. भारतातील एका छोट्या शहरात, व्यवसायाने शिक्षक असणारा गंगासागर अनेक महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या हातातील कठपुतळ्या बनवतो.आधुनिक भारत हा प्राचीन भारतासारखाच वर्णभेद, भ्रष्टाचार आणि समाज विभाजक राजकारण ह्यांनी दुंभगलेला आहे. हा कावेबाज पंडित, भारताला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा चमत्कार करू शकेल का? याचे उत्तर मिळवण्यासाठी अश्विन सांघी या सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणाऱ्या या लेखकाचे `चाणक्याचा मंत्र` हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
-
Sachin Tendulkar Chase Your Dreams (सचिन तेंडुलकर
अवघ्या अकराव्या वर्षी सचिनच्या क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा त्याला तरी कुठे माहीत होतं, की पुढील २४ वर्षं २२ यार्डांच्या खेळपट्टीशी आपलं नातं जोडलं जाणार आहे. ‘प्लेइंग इट माय वे’ या सचिनच्या आत्मचरित्राची (क्रिकेटचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या) तरुणांसाठीची आवृत्ती असंच ‘चेस युअर ड्रीम्स’या छोट्या आत्मचरित्राचं स्वरूप आहे. या छोट्या चरित्रातून सचिन आपली अवघी कारकीर्द... आपला अवघा जीवनपट वाचकांपुढे मांडतो. ‘प्लेइंग इट...’मधून दिसणारा सचिन या पुस्तकातूनही तितकाच उत्कटपणे दिसतो. सुरुवातीच्या काळी इतर देशांची काहीशी कुाqत्सत धारणा होती, की भारतीय संघ जलदगती गोलंदाजीपुढे नांगी टाकतो... बचावात्मक खेळतो. अजित वाडेकरच्या नेतृत्वाखालील संघाने विंडीजला त्यांच्याच मातीत धूळ चारत चमत्कारसदृश विजय मिळवले. लिटिल मास्टर सुनील गावसकरने आपल्या तंत्रशुद्ध सरळ बॅटच्या फलंदाजीने तेज बोलर्सना निष्प्रभ करीत भारतीय संघाची प्रतिमा उजळवली. गावसकरची हीच शास्त्रशुद्ध फलंदाजी सचिनसाठी प्रेरणा होती. सीमारेषा खुणावत असली तरी चांगल्या चेंडूला मान देत त्याने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला मुरड घातली. चकवणाऱ्या चेंडूना बॅकफूटवर जात सीमारेषा दाखवण्याची त्याची शैली प्रक्षणीय असायची. स्ट्रेट ड्राइव्ह, कव्हर ड्राइव्ह, फ्लिक, हुक, रिव्हर्स स्वीप अशी सर्व अस्त्रं त्याच्या भात्यात होती.
-
Six Machine (सिक्स मशिन)
"कसोटी सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षट्कार ठोकणारा ख्रिस गेल हा एकमेव फलंदाज आहे. पण अशा अनेक गोष्टी सहज शक्य करून दाखवणं, हा वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या रोजच्या जीवनाचाच एक भाग झालाय. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पहिलं शतक झळकवण्याचा मान ख्रिस गेलकडे जातो. विश्वकरंडक क्रिकेटस्पर्धेत त्यानेच प्रथम २०० धावा काढल्या. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत जलद शतक करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. टी२० क्रिकेट सामन्यात कोणत्याही फलंदाजाने मारलेल्या षट्कारांपेक्षा, त्याने दुप्पट षट्कार लगावले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याने दोन तडाखेबंद त्रिशतकं काढलेली आहेत. हे सर्व विक्रम करताना त्याच्या हातात क्रिकेटमधील सर्वांत वजनदार बॅट होती आणि चेहऱ्यावर सदा फुलणारं हास्य होतं. जगभर प्रवास करणाऱ्या ख्रिस गेलचे इन्स्ट्राग्राम व ट्विटरवर लाखो चाहते आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूच्या धडाकेबाज फलंदाजीची व नाइटक्लबमधील त्याच्या धमाल मस्तीची एक तरी झलक पाहायला-ऐकायला मिळावी यासाठी त्याचे चाहते कायम उत्सुकतेने वाट पाहत असतात. खेळपट्टीवर टिच्चून उभा राहत तो दीर्घ काळ फलंदाजी करतो, रात्रभर पार्टीत मौज करतो; दुसऱ्या दिवशी दुपारी उशिरा उठून प्रथम एका मोठ्या पॅनकेकचा फडशा पाडतो आणि मग दुर्दैवी गोलंदाजांची दुर्दशा करण्यासाठी पुन्हा मैदानात पाऊल ठेवतो. किंगस्टनच्या धुळीनं भरलेल्या रस्त्याच्या टोकाला, पत्र्याचं छप्पर असलेल्या एका घरात राहणाऱ्या, आपल्या तीन भावांबरोबर एकाच बिछान्यावर झोपणाऱ्या व पोटाची सोय करण्यासाठी रिकाम्या बाटल्या बाजारात विकणाऱ्या एका लाजऱ्याबुजऱ्या मुलाला, क्रिकेट जगतातील उच्च स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले, याची कथा. ही कथा केवळ एका असामान्य क्रिकेटपटूची नाही, तर विषमता व भेदभावाविरुद्ध झगडणाऱ्या, शून्यातून आपलं स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या व हे सर्व करताना आपलं स्वत्व हरवू न देणाऱ्या एका लढवय्याची आहे. "