-
The Art Of Management (द आर्ट ऑफ मॅनजमेंट)
या पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स`च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ‘प्रोफेशनल्स`चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स`कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.
-
SMILE PLEASE (स्माईल प्लीज)
आजूबाजूची माणसं, परिस्थिती, काळाच्या ओघात घडलेले बदल इ. बाबींवर खुसखुशीतपणे भाष्य करणारे लेख या लेखसंग्रहात आहेत. काही माणसं अशी असतात की त्यांनी काही वाचलं नाही, ऐकलं नाही. असं नसतंच मुळी. सगळंच माहीत असतं त्यांना. तर अशा व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र ‘सव्यसाची’ या लेखातून साकारलंय त्यांनी. तर काही विशिष्ट हेतूसाठी गळेपडूपणा करणार्या व्यक्तीचं प्रातिनिधिक चित्र रेखाटलंय ‘तुझ्या गळा...माझ्या गळा’ या लेखातून. पहाटे फिरायला गेलेल्या असताना एका कुत्र्याने रस्त्यात घातलेल्या गोंधळाचं रंगतदार चित्रण केलंय ‘दुम मचा ले...’ या लेखात. जाहिरातींच्या विश्वातल्या सदैव तरतरीत असणार्या बायकांचा खास शैलीत वेध घेतला आहे ‘नाहीतर आम्ही आहोतच’ या लेखात. तसेच खड्डेमय रस्ते, मेमरी ड्रॉइंग, मालिका व चित्रपटांमधील आजारपणं इ. विविध विषयांवरचे, अगदी साध्यासुध्या विषयांवरचे खुसखुशीत लेख आपल्या चेहर्यावर ‘स्माइल’ आणतात. People around us, circumstances, changes over time etc. This collection contains articles that comment on the subject in a crisp manner. Some people are such that they claim to have never read or heard anything. However, on the contrary, they know everything. The author has created a character sketch of such a person in the article 'Savyasachi'. The story “Tuzya Gala, Mazya Gala” portrays a person who develops friendship with people only to achieve his goal and then ignore them.The article 'Dhum Macha Le...' vividly depicts the chaos caused by a stray dog during the author’s early morning walk. The vibrant women in the world of advertising are captured in a special style in the article 'Nahitar Amhi Ahotach'. Supriya Mam has covered issues such as potholed roads, memory drawing, illness in serials and movies etc. and various routine topics through her interesting articles, that bring a 'smile' to your face.
-
The Stories We Tell (द स्टोरीज वी टेल)
‘द स्टोरीज वी टेल : पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधताना’ या पुस्तकात प्रख्यात पुराणकथा अभ्यासक देवदत्त पट्टनायक यांनी भारतातील व जगभरातील पुराणकथांच्या खजिन्यातून ७२ रत्ने निवडली आहेत. `टी टाईम टेल्स’ या त्यांच्या वेबकास्टमध्ये त्यांनी सांगितलेल्या कथांवर हे पुस्तक आधारित आहे. या पुस्तकात त्यांनी पुराणकथांतून आधुनिक जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक वाचकाला काळाच्या प्रदीर्घ टप्प्याची अनोखी सफर घडवते.
-
The Last Girl (द लास्ट गर्ल)
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.
-
Karunecha Swar (करुणेचा स्वर)
22 मे 2016, या दिवशी डॉ.किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं. पॉंडिचेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ.किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.
-
Hows That (हाऊज दॅट)
‘पॉपकॉर्न’नंतर, सुप्रिया वकील यांचा ‘हाऊज दॅट!’ हा दुसरा विनोदी ललित गद्य संग्रह. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी, होणारे बदल, स्वभावविशेष, जीवनातील विविध रंग टिपत, खुसखुशीत शैलीत लिहिलेले हे लेख वाचकांना आपलेसे वाटतील आणि खळखळून हसवतील. सूक्ष्म निरीक्षणातून जीवनातील गंमत टिपताना, त्यांची लेखणी कुठेही कडवट न होता निखळ विनोद फुलवते. अनुवादक म्हणून सुपरिचित असलेल्या सुप्रिया वकील यांचे हे स्वतंत्र लेखनही वाचकांना नक्की आवडेल.
-
The Ministry Of Utmost Happiness (द मिनिस्ट्री ऑफ
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.
-
Anup
‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे रातोरात `स्टार` बनणं...त्यानंतर ग्लॅमरचा त्याग करून योगाश्रमात राहणं... तिथून मुंबईला परत आल्यानंतर दुर्दैवी कार अपघात होणं... कोमात गेलेल्या आणि छिन्नविच्छिन्न झालेल्या अनू पुन्हा बऱ्या होणं... त्यांनी परत आत्मशोधासाठी सज्ज होणं... संन्यास घेणं आणि त्यानंतर मुंबईत योगाचे धडे द्यायला लागणं... अनू यांच्या आत्मशोधाची... मृत्यूचा उंबरठा शिवण्याच्या अनुभवाची आणि पुन्हा जीवनरसानं फुलणाऱ्या चमत्काराची ही कहाणी.
-
Majhi Jivanyatra Swapne Sakartana... (माझी जीवनयात
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तीदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढ निश्चय,धाडस,चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवन यात्रेदरम्यांच्या आठवणी,भेटलेली माणसं. ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती,त्यांचे जिवलग, मार्गदर्शक,गुरु या सगळ्यांबद्द्ल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहिलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग,संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक,स्फूर्तीदायी आणि प्रेरक आहे.
-
Thought Leaders (थॉट लिडर्स )
आपण जर चाकोरी बाहेरचे काही करू पहात असाल आणि हे कितपत जमेल असे आपल्याला वाटत असेल तर हे पुस्तक आपण ओळ न् ओळ वाचलेच पाहिजे कारण ह्या पुस्तकात केवळ तात्विक/बौद्धिक दृष्ट्याच नव्हेतर असे केलेल्या एक-दोन नाहीतर तब्बल दोन व्यक्तींचे कार्यच वाचकांपुढे ठेवले आहे ते हे अश्या रीतीने की वाचनाचा कंटाळा तर येणार नाहीच पण असे काही करण्याचे मनातही नसणार्यांच्याही मनात तसे विचार पिंगा घालू लागतील. अनू आगा, रवी खन्ना, राजाभाऊ चितळे, प्रताप पवार, मनोज तिरोडकर असे हे बावीस जग कसे पुढे जात राहिले हे तर प्रत्यक्ष त्यांना भेटूनच लेखकाने जाणून घेतले आहेच न् त्यांच्यातील समान धागे शोधून त्याचेही विस्ताराने विवेचन केले आहे. या पुस्तकात जो आपवादात्मक व्यावसायिक जीवनांचा मूलस्त्रोतसंग्रह आहे तो प्रत्येक तरुणाला (आणि तरूणीलाही) मार्गदर्शकपर वारसालाच आहे.
-
J.R.D Tata Yanche Patra (जेआर.डी टाटा यांचे पत्र)
सध्याच्या वेगवान जगात ई-मेल्स ,सेलफोन, अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे :पण एकेकाळी मुख्यत्वे पत्र या माध्यमातून संपर्क साधला जात असे पत्रांतून कामांच्या तपशीलाखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे . शिवाय हि पत्रे पत्रं त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तएवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत .पत्र हा कायमस्वरूपी माहितीस्त्रोत असतो . या पुस्तकातील सुमारे ३०० पत्र इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत . जे .आर. डी. टाटा या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली हि विविध विषांयान स्पर्श करणारी पत्र तत्कालीन सामाजिक , राजकीय, आर्थिक, औघोगिक अशा अनेक क्षेत्रंच दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एक महान, बहुआयामी व्याक्तीत्वंच अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात .