-
The Right Choice (द राईट चॉईस)
करिअरच्या दरम्यान लोकांना अनेकदा ज्या पेचप्रसंगाना सामोरे जावे लागते, त्यांचा सखोल अभ्यास द राईट चॉइस हे पुस्तक करते. इंडिया इंकमधील सर्वांत जास्त काळ सेवा देणारे सीइओ म्हणून कार्यरत असणारे शिव शिवकुमार आपल्या देदिप्यमान करिअरच्या दरम्यान मिळवलेले ज्ञान व अनुभव या पुस्तकातून आपल्यापुढे मांडतात. हे दहा पेचप्रसंग सोडवण्यासाठी आवश्यक असलेली शिकवण आणि धडे त्यांचे वैशिष्ट्य असलेल्या त्यांच्या थेट आणि स्पष्ट शैलीत ते आपल्याला देतात. उच्च अनुभव असलेल्या चोवीस व्यावसायिकांकडून मिळणारी अंतर्दृष्टी आणि वेगळे विचार यांचा देखील या पुस्तकात समावेश आहे. यशस्वी करिअर ही कधीच एका रेषेत नसते; त्यामध्ये अशी असंख्य वळणे आणि तिढे असतात जिथे तुमच्यासमोर निवड करताना अडचणी उभ्या ठाकतात. अत्यंत व्यावहारिक आणि प्रेरक असलेले द राईट चॉइस आपल्याला या कठीण परिस्थितीतून मार्ग काढायला आणि यशस्वी करिअरमध्ये मदत करते.
-
The Art Of Management (द आर्ट ऑफ मॅनजमेंट)
या पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स`च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ‘प्रोफेशनल्स`चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स`कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.